कोरोना महामारीपेक्षाही जगावर दुसरं भयंकर संकट; WHO प्रमुखांचा धोक्याचा इशारा

वृत्तसंस्था
Sunday, 22 November 2020

जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा जगाला सतर्क केलं आहे.

जिनिव्हा- जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा जगाला सतर्क केलं आहे. वाढणारा अँटिबायोटिक रेझिस्टन्स (antimicrobial resistance) कोरोना महामारीसारखाच धोकादायक असल्याचं डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हटलं आहे. यासाठी सर्व देशांनी येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले आहेत.

अँटिबायोटिक रेझिस्टन्स हा आपल्या काळातील मोठा आरोग्य धोका आहे. यामुळे आपली शतकांची वैद्यकीय प्रगती निष्फळ ठरु शकते. आपल्याकडील अँटिबायोटिक्स झपाट्याने निष्प्रभ होत आहेत आणि रोगजंतू शक्तीशाली बनत आहेत. सध्या उपलब्ध असेलेल्या प्रत्येक अँटिबायोटिकसाठी रोगजंतू इम्युन होत आहेत. त्यामुळे कोरोनो विषाणूपेक्षा अँटिबायोटिक रेझिस्टन्स धोकादायक असल्याचं टेड्रोस घेब्रेयसस म्हणाले आहेत. 

चीनने डोकलाममध्ये गावच वसवलं नाही, तर पक्का रस्ताही बनवला; सॅटेलाईट फोटोंमधून...

काही वर्षांपासून अँटिबायोटिक्सना रेझिस्टन्स वाढला आहे, अँटिबायोटिक्सच्या जास्तीच्या वापरामुळे असं होत आहे. अँटिबायोटिक रेझिस्टन्समुळे येत्या काही वर्षांत जंतूसंसर्गावर उपचार करण्यासाठी आपल्याकडे एकही अँटिबायोटिक उरलेले नसेल. अतिरेकी हल्ले किंवा हवामान बदलाइतकाच धोकादायक असा हा प्रकार आहे. अँटिबायोटिक रेझिस्टन्स हा कोरोनासारखा तात्काळ लक्ष देण्यासारखा विषय वाटत नसला, तरी याचा धोका अधिक आहे, असंही टेड्रोस म्हणाले आहेत. 

काय आहे अँटिबायोटिक रेझिस्टन्स?

इतर सर्व औषधे शरीरातील पेशींवर काम करतात, तर अँटिबायोटिक शरीरातील जिवाणूंवर हल्ला करून त्यांना नष्ट करत असतात. काही अँटिबायोटिक्स काही विशिष्ट जिवाणूंविरुद्धच प्रभावी तर काही अनेकविध जंतूसाठी मारक ठरतात. सर्व जिवाणूंचा समूळ नाश व्हावा व इन्फेक्शन परत उलटू नये यासाठी अँटिबायोटिक ठरावीक काळासाठी डोस न चुकवता नियमितपणे घ्यावे लागते. अचूक रोगनिदान करून योग्य मात्रेत व योग्य कालावधीसाठी ते घेतले तरच ते प्रभावी ठरत असते.पण, पूर्वी जे रोगजंतू या औषधांनी मारले जात होते, ते आज त्यांना दाद देईनासे झाले आहेत. यासाठी अधिकाधिक स्ट्राँग अँटिबायोटिक्स वापरावी लागत आहेत. अतिवापर, कमी वापर किंवा चुकीचा वापर या परिस्थितीमुळे अँटिबायोटिक्सना रेझिस्टन्स वाढला आहे. त्यामुळे रोगजंतू अँटिबायोटिक्सना दाद देणासे झाले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO chief Tedros Ghebreyesus antimicrobial resistance is dangerous as coronavirus pandemic