चीनने डोकलाममध्ये गावच वसवलं नाही, तर पक्का रस्ताही बनवला; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

CHINA
CHINA

नवी दिल्ली- भारत-चीन सीमेलगतच्या सॅटेलाईट फोटोंमधून (Satelite Imagery)  धक्कादायक माहिती समोर येत आहे. सॅटेलाईट फोटोंमधून स्पष्ट दिसून येतंय की, चीनने डोकलाम पठारावरील पूर्व भागातील भूतान क्षेत्रामध्ये 2 किलोमीटर अंतरापर्यंत गाव वसवलं आहे, शिवाय चीनने भारतीय सीमा क्षेत्रापर्यंत येणारा 9 किलोमीटर लांब रस्ता बनवला आहे. 

2017 मध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावानंतर भारतीय सैन्याने डोकलाम येथील मार्ग रोखला होता. त्यानंतर चीनने याठिकाणी येणारा पर्यायी मार्ग बनवला आहे.  चीनने भारतीय सैन्याच्या ठिकाणाजवळ मोठ्या प्रमाणात बांधकाम कार्य हाती घेतले आहे. 2017 मध्ये भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर चीनने याठिकाणी हालचाली वाढवल्या आहेत. हा भाग सिक्कीमची सीमा आणि डोकलाममध्ये येतो. 

डेंगू, कोरोना आणि आता क्रोबा चावला; भारतात अडकलेल्या फॉरेनरची वेदनादायी कहानी

तीन वर्षांनंतर चीनच्या कामगारांनी टोरसा नदीच्या किनाऱ्याला लागून एक रस्ता तयार केला आहे. टोरसा नदी चीन आणि भूटानच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण भागात पसरली आहे. हा भाग 2017 मध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेपासून 10 किलोमीटर लांब आहे. डोकलाम तणाव 2 महिन्यांपर्यंत चालला. त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची वुहान शहरात भेट झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी डोकलाम तणाव कमी करण्यावर सहमती दर्शवली होती. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनच्या सैनिकांनी 2017 मध्ये माघार घेतली असली, तरी चीनने डोकलामच्या आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. चीनने या भागात बिल्डिंग आणि रस्त्यांचे बांधकाम केले आहे. याशिवाय येथील एका पठारावर गाव उभे केले आहे, ज्याचे तीन वर्षांपूर्वी काहीही अस्तित्व नव्हते. 

औघड हाय! कोरोनाने मृत्यू झालेल्याचे केले अंत्यसंस्कार; उत्तरकार्याला परतला जिवंत

चीनच्या ग्लोबल टाईम्सने नदी किनारी वसलेल्या एका गावासोबत अन्य काही फोटो शेअर केले आहे. सीनियर प्रोड्यूसर शेन शिवेई म्हणालेत की, ''आता आमच्याकडे गावात राहण्यासाठी लोक आहे. हे गाव यादोंग देशपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे.''दरम्यान, अमेरिकी टेक्नोलॉजी कंपनी 'मॅक्सर'च्या सॅटेलाईट फोटोंमधून स्पष्ट झालंय की, चीनने याच वर्षी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु केले आहे. टोरसा नदीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी झाली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com