बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

WHO global health emergency डेमोक्रेटिक रिपल्बिक ऑफ कांगो आणि युगांडामध्ये इबोला साथीने ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३०० पेक्षा जास्त संशयित सापडल्यानं खळबळ उडाली आहे. बुंडिबुग्यो व्हायरसव अद्याप कोणतीही लस नाहीय.
Ebola Outbreak Kills 88 in Congo and Uganda WHO Sounds Alarm

Ebola Outbreak Kills 88 in Congo and Uganda WHO Sounds Alarm

Esakal

Updated on

एका बाजूला युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट असताना दुसरीकडे आफ्रिकन देशांमध्ये इबोलाच्या साथीनं थैमान घातलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी घोषित केलीय. डेमोक्रेटिक रिपल्बिक ऑफ कांगो आणि युगांडामध्ये इबोला साथीने ८८ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३०० पेक्षा जास्त संशयित सापडले आहेत. जगभरात यामुळे साथीचा धोका निर्माण झाला असून चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानम घेब्रेयसस यांनी सोशल मीडियावर सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्याची माहिती दिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com