'अमेरिका, भारतासह ब्राझील कोरोनावर मात करण्यासाठी सक्षम'

सुशांत जाधव
Saturday, 25 July 2020

अमेरिका, ब्राझील आणि भारत या राष्ट्रांमध्ये कोरोना विषाणूचा सामना करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

जिनेव्हा : जगभरातील 180 हून अधिक देशात कोरोना विषाणूनं शिरकाव केलाय. सध्याच्या घडीला अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीन राष्ट्रांत कोरोना विषाणूचं वेगाने संक्रमण होतानाचे भयावह चित्र दिसत आहे. हे तिन्ही देश कोरोनाच्या लढ्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी व्यक्त केलाय.  अमेरिका, ब्राझील आणि भारत या राष्ट्रांमध्ये कोरोना विषाणूचा सामना करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  

दिलासादायक! भारतात कोरोनावरील पहिली लस विकसित; मानवी चाचणीस सुरुवात

प्रसारमाध्यमांशी बोलताना माइक रायन म्हणाले की, लोकशाही मजबूत असलेल्या अमेरिका, ब्राझील आणि भारत ही राष्ट्रे शक्तीशाली आणि सामर्थ्यवान आहेत. अंतर्गत क्षमतेच्या जोरावर कोरोनावर मात करण्यासाठी तिन्ही राष्ट्रे सक्षम आहेत. कोरोनाच्या संकटातून ही सर्व राष्ट्र सहज बाहेर पडतील. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसतोय. शनिवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 13 लाखहून अधिक झाला आहे.

राजस्थान सत्तासंघर्ष: CM गेहलोतांनी मंत्र्यांना मध्यरात्रीपर्यंत जागवले!

जवळपास 31 हजार लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. मागील आठवड्यात भारतातील कोरोनाचा वेग हा ब्राझीलपेक्षा अधिक असल्याचे समोर आले होते. ब्राझील आणि भारत यांच्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत 10 लाख एवढा मोठा फरक असला तरी दिवसागणिक आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्यच्या आठवड्याच्या आकडेवारीत पहिल्यांदाच भारतात ब्राझीलपेक्षा अधिक रुग्ण आढळल्याचे समोर आले होते. अमेरिकेतील परिस्थिती कोरोनाग्रस्तांच्या एकूण आकडेवारीसह दिवसागणिक वाढणाऱ्या आकडेवारीनेही चिंताजनक अशीच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who dr mike ryan said india us and brazil can deal with coronavirus covid19