esakal | कोव्हॅक्सिनच्या जागतीक मान्यतेवर आज निर्णय नाही, आठवडाभर लांबणीवर!
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

कोव्हॅक्सिनच्या जागतीक मान्यतेवर आज निर्णय नाही, आठवडाभर लांबणीवर!

sakal_logo
By
सुधीर काकडे

भारताची पहिली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन या लशीचा इमर्जन्सी युज लिस्टमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय WHO लवकरच घेणार आहे. WHO आणि तज्ञांचा एक स्वतंत्र गट याविषयीचा निर्णय आज घेतील अशी शक्यता होती, मात्र पुन्हा एकदा हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीला जागतिक मान्यता मिळण्यासाठी किमान आठवडाभर वाट पाहावी लागू शकते अशी शक्यता आहे.

इमर्जन्सी युज लिस्टमध्ये एखाद्या लसीचा समावेश करण्यासाठी WHOकडून मागवण्यात आलेला सर्व डेटा कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकने २७ सप्टेंबरला दिला आहे. WHOचे तज्ञ सध्या या डेटावर अभ्यास करत असून सर्व निकषांना पात्र ठरल्यानंतर या लशीला अंतिम मान्यता मिळणार आहे.

हेही वाचा: France: "कॅथलिक चर्चमध्ये ७० वर्षांत लाखो मुलांवर लैंगिक अत्याचार"

दरम्यान, आत्तापर्यंत WHOनं पीफायझर, अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, चीनची सिनोफार्म आणि युकेच्या ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका या लसींना आपत्कालिन वापरासाठी मंजुरी दिली आहे. गेल्या महिन्यात भारत बायोटेकनं म्हटलं होतं की, WHOकडे मंजुरीसाठीची संपूर्ण डेटा शेअर केला असून याच्या फिडबॅकची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकचं म्हणणं आहे की, कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्समध्ये ही लस ७७.८ टक्के कार्यक्षम आहे.

loading image
go to top