

Who Is Kang Wei
Esakal
एनव्हिडियाचे प्रमुख जेनसन हुआंग आणि चिनी महिला अॅलिस हुआंग यांच्या अफेअरची चर्चा गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे. यामुळे जेनसन हुआंग यांना एनव्हिडियाचं सीईओपदही गमवावं लागलं. दरम्यान अॅलिस हुआंगबाबत आता मोठी माहिती समोर आलीय. अॅलिसचे पती कांग वेई यांनी चीनमध्ये तब्बल ९ अब्ज डॉलरपेक्षा अधिक किमतीचे डेटा सेंटर प्रकल्प उभारल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे जेनसन हुआंग यांची अॅलिस यांच्याशी पती कांग वेई यांनीच ओळख करून दिली होती.