
थायलंडमध्ये एक मोठा सेक्स आणि ब्लॅकमेल घोटाळा समोर आला आहे. ज्यामध्ये विलावन एम्सावत नावाच्या एका महिलेने अनेक वरिष्ठ बौद्ध भिक्षूंना आपल्या जाळ्यात अडकवले. पोलिसांनी सांगितले की, ती भिक्षूंसोबत लैंगिक संबंध ठेवायची आणि नंतर त्यांना खाजगी व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करायची आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचे.