esakal | जागतिक आरोग्य संघटनेकडून मुंबईतील धारावी मॉडेलचं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

WHO, Mumbai, Dharavi

राष्ट्रीय आणि जागतिक ऐक्यानं  कोरोना विषाणूसारख्या महा साथीच्या रोगाला रोखणे शक्य आहे, असे टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून मुंबईतील धारावी मॉडेलचं कौतुक

sakal_logo
By
सुशांत जाधव

देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना मुंबईच्या धारावीतून एक चांगली बातमी ऐकायला मिळाली होती. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यात  सरकार आणि प्रशासनाला यश मिळाले. तब्बल 2.5 चौरस किमी पसरलेल्या या भागात जवळपास 6.5 लाख लोकं वास्तव्य करत आहेत. या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर वाढणाऱ्या रुग्णांची संख्या सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढवणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सद्य परिस्थितीत धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील धारावी मॉडेलचे कौतुक केले आहे.  

अण्वस्त्रविषयक चर्चेचे निमंत्रण नाकारतानाच निर्बंधांविरुद्ध उपाययोजना करू

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील 'धारावी मॉडेल'ची स्तुती केलीय. राष्ट्रीय आणि जागतिक ऐक्यानं  कोरोना विषाणूसारख्या महा साथीच्या रोगाला रोखणे शक्य आहे, असे टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस म्हटले आहे. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) यासारख्या ठिकाणी अधिक लोकवस्ती असलेला भाग  अत्यंत गंभीर परिस्थितीतून सावरला आहे.  चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, आणि अलगिकरण करुन संसर्गाची साखळी तोडणे शक्य आहे. कोरोना विजय मिळवणं शक्य आहे, हेच यातून दिसून येते, असेही जागतिक आरोग्य संघटनच्या प्रमुखांनी म्हटले आहे.