कोरोना पसरला कसा? चीनच्या वुहान शहरात WHOला मिळाले महत्त्वाचे पुरावे

Who probe China Wuhan Coronavirus important clue
Who probe China Wuhan Coronavirus important clue

वुहान : चीनमधील वुहान शहरात डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वुहानमधून युरोपात इटली आणि तिथून इराण मार्गे हा व्हायरस संपूर्ण जगात पसरला. पंरतु, आजही चीन या व्हायरसचा उगम वुहानमध्ये झाला, हे नाकारत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सातत्याने दबाव टाकल्यानंतरही चीन आपली चूक मान्य करायला तयार नाही. मात्र, आता आरोग्य संघटनेला वुहानमध्ये महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने अनेकदा विनंत्या करूनही चीन वुहानमधील संशोधनास परवानगी देत नव्हते. मात्र, चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या झाल्यानंतर चीनने जागतिक आरोग्य संघटनेला तपास करण्याची परवानगी दिली. आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांचे एक पथक वुहानमध्ये जानेवारी महिन्यात दाखल झाले होते. त्यांनी केलेल्या अभ्यासानंतर आता, त्यांच्या हाती महत्त्वाचे धागे-दोरे सापडले आहेत. त्यामुळं चीनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हायरसच्या प्रसाराला चीनच जबाबदार असल्याचं सिद्ध होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांनी कोणते पुरावे मिळाले? याची माहिती देण्यास नकार दिला आहे. संघटनेचे पदाधिकारी योग्य वेळी याची घोषणा करतील, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय.

संशोधनाचा उद्देश काय?
वुहानमधील एका प्रयोग शाळेतून कोरोना व्हायरस शहरात पसरल्याची प्राथमिक माहिती मिळालेली होती. मुळात हा व्हायरस वटवाघळांमधून मानवी शरिरात आला. एका फिश मार्केटमधून वटवाघळांचे मास खाल्ल्याने व्हायरस पसरल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, ही सगळी चर्चा होती. जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ सध्या वुहानमध्ये तळ ठोकून आहेत. जनावरांमधून हा व्हायरस मानवी शरिरात कसा आला? या विषयी सध्या शास्त्रज्ञ संशोधन करत असल्याची माहिती आरोग्य संघटनेने दिली. मुळात चीन सरकारने दिलेल्या माहितीच्या आधारावरच संशोधनाला सुरुवात करण्यात आली होती.

संशोधनाचे तीन महत्त्वाचे टप्पे

  • वुहान शहरात सुरुवातीला सापडलेल्या कोरोना रुग्णांचे प्राण्यांशी असणारे संबंध
  • सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या वुहानच्या फिश मार्केटला भेट देऊन, तेथील कार्यपद्धती तपासणे
  • फिश मार्केटशी संबंध न आलेल्या पहिल्या टप्प्यातील रुग्णांना लागण कशी झाली? याचा अभ्यास करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com