Uttarakhand Glacier news: उत्तराखंडमध्ये महाप्रलय; जाणून घ्या ग्लेशियर कसे आणि का तुटतात?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 7 February 2021

 भारतात उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नीति खोऱ्यात हिमकडा तुटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे.

नवी दिल्ली-  भारतात उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नीति खोऱ्यात हिमकडा तुटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. ग्लेशियर तुटल्यानंतर तपोवन बैराज पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून धौली नदीला महापूर आला आहे. ग्लेशियरला हिमनदी असंही म्हटलं जातं. खरंतर फक्त बर्फाची नदी ही धोकादायक नसते. पण ती जेव्हा तुटते आणि महाकाय रूप घेते तेव्हा नद्यांच्या पुरापेक्षाही धोकादायक असते. ग्लेशियर हे बर्फाचं सर्वाधिक प्रमाण असतं. जे हळू हळू वाहत असतं. 

ग्लेशियर दोन प्रकारचं असतं. अल्पाइन ग्लेशिअर किंवा व्हॅली ग्लेशियर पर्वतीय हिमनग आणि बर्फाची चादर. उत्तराखंडमध्ये जी घटना घडली त्यात पर्वतीय हिमनग प्रकाराचा समावेश आहे. उंच पर्वतांजवळ हे हिमनग तयार होता आणि वाहतात. पर्वतीय हिमनग हे सर्वाधिक धोकादायक मानले जातात. 

Uttarakhand Glacier Flood: उत्तराखंड हिमकडा कोसळल्यानं केदारनाथ प्रलयाची आठवण

पृथ्वीचा दहावा भाग ग्लेशियरच्या बर्फाने झाकलेला आहे. ग्लेशियर जिथं बनतात त्याठिकाणी दरवर्षी बर्फ जमा होतो आणि वितळायला लागतो. बर्फवृष्टी सुरु झाल्यानंतर बर्फ दबतो आणि त्याची घनता वाढते. त्याचं रुपांतर क्रिस्टलमधून सॉलिड बर्फाच्या गोळ्यात होतं. नव्या बर्फाच्या भारामुळे खाली दबतो आणि आणखी घट्ट होतो. त्याला फिर्न असं म्हणतात. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बर्फ जमा होतो. दबावामुळे तो तापमान कमी असतानासुद्धा वितळू लागतो आणि वजनामुळे वाहू लागतो. तिथून हिमनदीच्या स्वरुपात बर्फ खोऱ्यातून वाहत राहतो. 

Uttarakhand Glacier Flood LIVE: 150 लोक वाहून गेल्याची शक्यता; मुख्यमंत्री...

पर्वतीय ग्लेशियर अनेकदा धोकादायक असतो. ग्लेशियर खोऱ्यातून हळू हळू वाहतो मात्र काही ग्लेशियरमध्ये बर्फ सुरुवातीपासून एकदम वाहत नाही तर हिमस्खलन होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फ कोसळायला लागतो. चिमोलीत असाच बर्फाचा मोठा भाग कोसळला. हा बर्फ एकत्र वाहत आजुबाजुच्या भागावर पसरतो. एवढंच नाही तर बर्फाचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेगाने वाहतात. पर्वतारोहण करत असलेल्यांसाठी हे धोकादायक असतं. ग्लेशियर हे काही सेंटीमीटर प्रतिदिन इतक्या वेगाने वाहतात. तर काही एका दिवसात 50 मीटर वेगाने वाहतात. हे ग्लेशिअर धोकादायक असतात. त्यांना गॅलॉपिंग ग्लेशिअर असंही म्हटलं जातं. 

ग्लेशियरचे पाण्यासोबत मिळणे धोकादायक असते. यामुळे टाईडवॉटर ग्लेशियर (Tidewater Glacier) होते. ग्लेशियरचा भाग पाण्यावर तंरगतो. यामध्ये छोट्या-मोठ्या आकाराचे ग्लेसियर असू शकतात. यामुळेच धौला नदीचा पूर अन्य नद्यांपेक्षा अधिक धोकादायक आहे. ग्लेशियर खूप शक्तीशाली असतात. ते आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक वस्तूला चिरडून टाकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand Glacier Flood news Tidewater knowledge