esakal | कोविड लस येईपर्यंत किती लोकांचा बळी जाईल? WHOने सांगितला भीतीदायक आकडा
sakal

बोलून बातमी शोधा

who.jpg

कोरोना व्हायरसची भीती सर्व जगभरात असून बाधित आणि मृतांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे.

कोविड लस येईपर्यंत किती लोकांचा बळी जाईल? WHOने सांगितला भीतीदायक आकडा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

जिनिव्हा- कोरोना व्हायरसची भीती सर्व जगभरात असून बाधित आणि मृतांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आकडा २० लाखांपर्यंत पोचू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. कोरोनावर प्रभावी लस येण्यापूर्वी आणि व्यापक पातळीवर लोकांना लस देण्याआधी या साथीत बळी पडलेल्यांची संख्या २० लाखांपर्यंत पोचण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या जागतिक साथीला संघटित होऊन पावले उचलली नाहीत तर मृतांची संख्या २० लाखांपेक्षा जास्त होऊ शकते, असे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाबाधितांची संख्या साडे तीन कोटीच्या घरात आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रायन म्हणाले की, या साथीच्या सावटातून आपण अद्याप किंचितही बाहेर पडलेलो नाही. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास युवा पिढीला दोष देता कामा नये. कोरोना प्रसारासाठी आपण एकमेकांकडे बोट दाखवणार नाही, अशी मला अपेक्षा आहे. घरांमध्ये आयोजित केलेल्या मेजवानींमुळेही संक्रमण वाढत असून त्यात सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाचं करण जोहर कनेक्शन? धर्मा प्रोडक्शनच्या एकास अटक

डॉ. रायन म्हणाले...
- कोरोना विषाणूंचा प्रसार सुरू झाल्यापासून नऊ महिन्यांतील मृत्यूसंख्या सुमारे नऊ लाखांपेक्षा जास्त.
- कोरोनामुळे अमेरिकेत दोन लाखांपेक्षा अधिक मृत्यू.
- भारतात ९० हजार, ब्राझीलमध्ये दीड लाख तर रशियात २० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू.
- बाधित रुग्णसंख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर तर दुसऱ्या स्थानावर भारत आहे.

loading image
go to top