esakal | संतापजनक! इबोला संकटात मदतीला गेलेल्या WHO कर्मचाऱ्यांनी केले बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

WHO

संतापजनक! इबोला संकटात मदतीला गेलेल्या WHO कर्मचाऱ्यांनी केले बलात्कार

sakal_logo
By
सुधीर काकडे

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये इबोलाच्या महामारीच्या काळात काम करताना जागतिक आरोग्य संघटनेचे काही कर्मचारी आणि काही स्वयंसेवक अशा ८० पेक्षा जास्त जणांनी महिला आणि मुलींवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन आणि द न्यू ह्युमॅनिटेरियनने गेल्या वर्षी केलेल्या तपासामधून ही बाब समोर आली आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये घडलेल्या या घटनेत 50 हून अधिक महिलांनी डब्ल्यूएचओ आणि इतर धर्मादाय संस्थांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांवर 2018-2020 दरम्यान नोकरीच्या बदल्यात सेक्सची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकारणाचा तपास करण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने केलेल्या तपासात WHO चे २१ कर्मचारी दोषी आढळून आले आहेत.

हेही वाचा: आई-बाप रात्रभर मोबाईलवर खेळत होते गेम, बेडवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयोगातील सदस्य मलिक कौलीबाली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "पीडितांना लैंगिक संबंधांच्या बदल्यात किंवा नोकऱ्या ठेवण्यासाठी नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. "बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी असलेल्या अनेकांनी संभोग करताना कंडोम वापरण्यास नकार दिला होता, त्यामुळे २९ महिला गर्भवती झाल्या, तर आरोपींनी काहींना गर्भपात करण्यास भाग पाडले.

"तुमच्यासोबत जे घडले ते कधीही कोणासोबतही होऊ नये. हे अक्षम्य आहे. अपराध्यांना माफ केले जाणार नाही, त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील" असे WHO कडून सांगण्यात आल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तामधून समोर आले आहे.

loading image
go to top