
China-US : साउथ चीन समुद्रावर वर्चस्वासाठी चीन-अमेरिका महाशक्ती आमने-सामने
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने तैवानच्या समुद्रात लष्करी सराव सुरु केला आहे. अमेरिकेच्या तिसऱ्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीने तैवानला बेट दिल्याने चीन चवताळला होता. त्याने अमेरिकेला बजावले होते. मात्र तरीही नॅन्सी पेलोसी यांनी दौरा पूर्ण केला. मात्र त्यांचं विमान साउथ चायना सी म्हणजे दक्षिणी चीनी समुद्रावरुन न जाता वळसा घेतं तैपेईला पोहोचलं. चीनने नॅन्सी यांच्या भेटीनंतर लगेचच तैवानच्या सीमारेषांवर युद्धसराव सुरु केला. साउथ चायना समुद्र का महत्वाचा आहे. याविषयी आपण जाणून घेऊयात.
दक्षिण चीनी समुद्र हा पॅसिफीक महासागर आणि हिंदी महासागराच्या दरम्यानचा भाग आहे. अनेक बेटांमुळे याचं पॅसिफीक समुद्रातील महत्व वाढलंय. हा समुद्र चीनच्या दक्षिणेला, आशिया खंडाच्या आग्नेयला तर फिलिपिन्स आणि व्हीएतनाम, मलेशिया तसंच ब्रुनई आणि तैवानच्याच्या सीमारेषांना जोडलेला आहे. आखाती राष्ट्र, दक्षिण आफ्रिकेतून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी ह्या समुद्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
थायलंड , जापान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यामधील व्यापारी जहाजांची वाहतूक सुरू असते. साउथ चायना सी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त वापरला जाणारा समुद्री मार्ग आहे. चीन मात्र या समुद्रावर आपलं वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतोय.
एवढंच नाही तर चीनने अनेक कृत्रिम बेटं या समुद्रात निर्माण केली आहेत. 'साउथ चायना सी' हा प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या मधील भाग आहे. हा समुद्र सर्वप्रथम आपण शोधल्याचा दावा चीन करतं.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या समुद्राच्या भागावर जपानचं वर्चस्व होतं. मात्र जपनचा दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला. त्यानंतर जपानने या भागावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण हा समुद्र चीन, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स , तैवान , ब्रुनेई अशा राष्ट्रांच्या सीमारेषांना लागून असल्याने सगळेच जण या समुद्रावर आपला दावा करतात. दक्षिण चिनी समुद्राचं महत्व लक्षात घेउन, तसंच चीन या क्षेत्रावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात येताच, अमेरिकेनेही आपल्या युद्धनौका या समुद्रात गस्तीसाठी पाठवल्या आहेत. तर तैवानबरोबर आपले राजकिय संबंध वाढवले. तैवान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानतं. जगातील १३ देश तैवानला स्वतंत्र राष्ट्र मानतात.
हेही वाचा: China-Taiwan Tension : ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव, समुद्रातही युद्धनौका दाखल
दक्षिण चिनी समुद्राचं महत्व लक्षात घेउन, तसंच चीन या क्षेत्रावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात येताच, अमेरिकेनेही आपल्या युद्धनौका या समुद्रात गस्तीसाठी पाठवल्या आहेत. अमेरिकेची युद्धनौका रोनाल्ड रिगन ही एअरक्राफ्ट वाहक आणि अतिशय सुसज्ज आणि आधुनिक युद्धनौका आहे. अमेरिकेचं शिष्टमंडळ तैवानला पोहोचण्यापूर्वी रोनाल्ड रिगन साऊथ चायना समुद्रात दाखल झाली होती.
Web Title: Why China Trying To Dominate South China Sea
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..