esakal | नासाला का हवी आहे चंद्रावरची माती आणि खनिज पदार्थ?
sakal

बोलून बातमी शोधा

moon1.jpg

अमेरिकेची प्रसिद्ध नासा संस्था आता चंद्रावरची माती, दगड आणि अन्य खनिज पदार्थ खरेदी करण्याच्या विचारात आहे.

नासाला का हवी आहे चंद्रावरची माती आणि खनिज पदार्थ?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेची प्रसिद्ध नासा (NASA) संस्था आता चंद्रावरची (LUNAR) माती, दगड आणि अन्य खनिज पदार्थ खरेदी करण्याच्या विचारात आहे. या कामासाठी नासा चंद्रावर उत्खनन करु इच्छिणाऱ्या कंपन्यांचा शोध घेत आहे. यासंदर्भात लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. या जागतिक निविदा जगभरातील कोणताही संशोधन संस्था भरु शकणार आहे.

WHO ने केलं पाकिस्तानचे कौतुक; इतर देशांना शिकण्याचा दिला सल्ला

या मोहिमेच्या माध्यमातून नासा आकाशगंगाबाबत उत्खननास कायद्याचे रुप देऊ इच्छित आहे. अर्थात या मोहिमेवर जाणाऱ्या कंपनीला स्वत:च खर्च करावा लागणार आहे. तेथून माती किंवा दगडाचे नमुने एकत्र करायचे आहेत. या मोहिमेला नासा कायदेशीर रुप देऊ इच्छित आहे, जेणेकरून भविष्यात चंद्रावरून बर्फ, हीलियम किंवा अन्य खनिज पदार्थाचे उत्खनन करण्याचा अधिकार मिळेल. दुसरीकडे भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी नासा स्थानिक साधनांचा, साहित्यांचा वापर करु इच्छित आहे.

नासाचे प्रशासकीय अधिकारी जिम बायडेनस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रावरच्या उत्खनन मोहिमेसाठी बजेट निश्‍चित झालेले नाही. मात्र स्पर्धेच्या आधारावर रक्कम निश्‍चित केली जाईल. चंद्रावरच्या उत्खननासाठी नासाच्या प्रस्तावित निविदांसाठी सहा कंपन्या इच्छुक आहेत. यात टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची स्पेस एक्सप्लारेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन आणि ॲस्ट्रोबायोटिक्स टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. तत्पूर्वी चंद्राच्या जमीनीवर कार्गो किंवा अंतराळवीर उतरवण्यावरून कंपन्यांनी नासाकडून अगोदरच कंत्राट पदरात पाडून घेतले आहे.
उत्खननाचा उल्लेख नाही

अमित शहांच्या प्रकृतीबद्दल AIIMS ने दिली माहिती

युनायटेड नेशन्स आउटर स्पेस ट्रिटी ऑफ १९६७ तंर्गत अंतराळातील हालचाली किंवा मोहिमा नियंत्रित केल्या जातात. यानुसार कोणताही देश सैन्य किंवा आण्विक हेतूने अंतराळात मोहिम करु शकत नाही. त्याचबरोबर अंतराळावरच्या कोणत्याही भागांवर कोणत्याही देशाचा दावा नाही. शांततापूर्ण उद्देशासाठी अंतराळ मोहिमांना परवानगी दिली जाते. अर्थात या करारात उत्खननाचा उल्लेख नाही. जिम ब्रायडेनस्टिन म्हणाले, की अंतराळातील स्रोतांचे उत्खनन आणि व्यापारासाठी नियम करण्याची वेळ आली आहे.