

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून आंतरराष्ट्रीय माध्यमांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, "मला माझा देश सोडण्यास भाग पाडले गेले, पण मी माझ्या लोकांपासून कधीच दुरावले नाही." बोलताना त्या भावूक झाल्या. आपल्या कुटुंबीयांना आदरांजली वाहताना त्यांना वारंवार अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, "मी अशा व्यक्तीच्या भूमिकेतून बोलत आहे, जिने आपले आयुष्य बांगलादेशच्या लोकांसोबत व्यतीत केले आहे."