
बीजिंग : चीनमध्ये जुलैपासून सोमवारी प्रथमच एकाही स्थानिक कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी सामुहिक चाचण्या, विलगीकरण, उपचार असे उपाय काटेकोरपणे अवलंबिल्यामुळे हे शक्य झाले. (Why has there not been a single local patient of corona in China since July)
गेल्या महिन्यात सुरु झालेला संसर्ग यामुळे आटोक्यात आला आहे. २० जुलै रोजी पूर्वेकडील नानजिंग शहरात विमानतळावरील काही कर्मचाऱ्यांना संसर्ग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून बाराशेहून जास्त रुग्णांची नोंद झाली होती. संसर्गाच्या सध्याच्या टप्प्यात एकही मृत्यू झालेला नाही. जियांग्सू प्रांतातील नानजिंग आणि यांगझू या दोन शहरांत संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
चीनमध्ये देशपातळीवर गेल्या आठवड्यात नव्या स्थानिक रुग्णांची संख्या एकेरी झाली. ऑगस्टमध्ये ती जास्त होती. त्यानंतर शांघायमध्ये दोन विमानतळावर मालवाहू विमानांशी संबंधित कामे करणाऱ्या शेकडो बाधित कामगारांचे विलगीकरण करण्यात आले.
२२ ऑगस्टअखेर चीनमधील रुग्णांची एकूण संख्या ९४ हजार ६५२ आहे. जी अजूनही एक लाखाच्या आत आहे. मृतांची संख्या केवळ ४६३६ इतकीच आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून हे आकडे बदललेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.