why iran attack against pakistan know the history of conflict
why iran attack against pakistan know the history of conflictSakal

Iran Vs Pakistan: मित्र राष्ट्र असणाऱ्या इराणने पाकिस्तानवर हल्ला का केला? असा आहे संघर्षाचा इतिहास

Iran Vs Pakistan: नुकताच इराणने पाकिस्तान, सिरिया आणि इराक वर क्षेपणास्त्र हल्ला चढविला आहे. यावर आता सर्व जगाभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पॅलेस्टाईन आणि इस्त्राईलचं युद्ध थांबायचं नाव घेईना तर दुसरीकडे इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानातमध्ये ‘जैश अल अदल’ या अतिरेकी संघटनांच्या दोन ठिकाणावर हल्ले केले आहेत.

- मनोज साळवे

Iran Vs Pakistan: नुकताच इराणने पाकिस्तान, सिरिया आणि इराक वर क्षेपणास्त्र हल्ला चढविला आहे. यावर आता सर्व जगाभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पॅलेस्टाईन आणि इस्त्राईलचं युद्ध थांबायचं नाव घेईना तर दुसरीकडे इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानातमध्ये ‘जैश अल अदल’ या अतिरेकी संघटनांच्या दोन ठिकाणावर हल्ले केले आहेत.

दरम्यान हल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हवाई हल्ले केले. पण इराणसारखा देश पाकिस्तानवर का हल्ला करत आहे? यामागे काय रणनीती आहे? इराणने पाकिस्तानच्या आतंकवादी ठिकाणांवर हल्ला करण्याचे नेमके कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

इराण वारंवार सांगत आले आहे, की शेजारील आखाती देश दहशतवाद्यांना थारा देत आहेत. तरीही पाकिस्तान इतर देशातील दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याने वारंवार हल्ले होत आहेत.

हल्ला करण्याचे नेमके कारण काय?

‘जैश अल अदल’ ही आतंकवादी संघटना वारंवार पाकिस्तानच्या शेजारी असणाऱ्या इराणच्या सैन्यावर हल्ला करत होती. पाकिस्तानने या आतंकवाद्यांना बलुचिस्तानमध्ये आश्रय दिला असून त्यांनी नुकतेच इराणच्या काही सैनिकांवर हल्ला चढविला होता.

इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीर अब्दोल्लाहियन दावोस मधील वर्ड इकोनॉमिक्स फोरम(World Economic Forum) मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की ‘जैश अल अदल’ हा इराणचा दहशतवादी गट आहे तो सध्या पाकिस्तानच्या भुमीचा आश्रय घेऊन इराणवर हल्ले करत आहे.

त्यामुळे इराणने तिथे हल्ला केल्याचे ते म्हणाले.” मुख्य म्हणजे हा हल्ला पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अल्वर उल काकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दोल्लाहियन दावोस दौऱ्यावर गेले असताना झाला आहे.

इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानच का टार्गेट केले?

‘जैश उल अदल’ ही एक सुन्नी अतिरेकी आणि बलुची फुटीरवादी संघटना आहे. जी प्रामुख्याने आग्नेय इराणमध्ये कार्यरत आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानामध्ये या संघटनेच्या अनेक छावण्या आहेत.

तेथे आश्रय घेऊन त्यांनी अनेकवेळा इराणमध्ये होणाऱ्या लष्करी जवानांच्या हल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. 15 डिसेंबर 2023 रोजी, ‘जैश उल अदल’ गटाने रस्क, सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील एका पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. त्यामध्ये 11 पोलिस अधिकारी मारले होते.

why iran attack against pakistan know the history of conflict
Israel Hamas War: इस्रायली सैन्यावर मोठा हल्ला, गाझामध्ये हमाससोबतच्या लढाईत २१ जवान शहीद

‘जैश उल अदल’ संघटनेचा इतिहास काय आहे?

या संघटनेचे नाव जुंदल्लाह असे होते, परंतु 2012 मध्ये तिचे नाव बदलले. नॅशनल इंटेलिजन्सच्या वेबसाइटनुसार, त्याला 'पीपल्स रेझिस्टन्स ऑफ इराण' असेही म्हटले जाते. अब्दुल मलिक रेगी यांनी 2002 आणि 2003 मध्ये ही संघटना स्थापन केली.

रेगींनी या संघटनेचे अनेक वर्षे नेतृत्व केले. नंतर इराणने 2010 मध्ये अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. सलाहुद्दीन फारुकी हा 2011 पासून या गटाचा नेता आहे. जैश अल-अदल त्याला 'अमीर' आणि 'बलुचिस्तान जिहाद'चा नेता म्हणतो.

हल्ला कसा केला?

इराणने या अतिरेकी संघटनेवर हल्ला करताना नवीन टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या शस्त्रांचा वापर केला. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन कॅमेराद्वारे हल्ला करण्यात आला.

या हल्यात पाकिस्तानातील दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून आणखी काही व्यक्ती जखमी झाले आहेत. इराणच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेत तेहरानमधून आपले राजदूत परत बोलावले आहेत. याबरोबरच इराणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही पाकिस्तानकडून देण्यात आला आहे.

why iran attack against pakistan know the history of conflict
India-Maldives Relations: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु यांच्या भारतविरोधी भूमिकेला विरोधकांनी फटकारलं! म्हणाले "भारत आमचा जुना मित्र"

इराणच्या सीमेच्या पूर्व भागावर सिस्तान बलुचिस्तान प्रांत आहे. आणि तो पाकिस्तानच्या पश्चिम बलुचिस्तान प्रांताला जोडून आहे. इराणच्या सरकारी मीडिया नुसार हल्ला हा प्रामुख्याने पाकिस्तान आश्रय देत असलेल्या अतिरेकी ठिकाणांवर केला आहे. जेणेकरुन सामान्य नागरिकांवर हल्याचा परिणाम होणार नाही.

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपूर्व अन्नधान्याचे दर इतके वाढले होते की त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे पाकिस्तान अतिरेकी संघटनांना देशात आश्रय देत असल्याने त्याची झळ सामान्य नागरिकांना सहन करावी लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com