Israel Hamas War: इस्रायली सैन्यावर मोठा हल्ला, गाझामध्ये हमाससोबतच्या लढाईत २१ जवान शहीद

Israel Hamas War: युद्धादरम्यान एक मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये काही सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यात दोन इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याच वेळी इस्रायली सैन्याच्या टँकवर हमासच्या सैनिकांनी आरपीजीसह हल्ला केला.
Israel Hamas War
Israel Hamas WarEsakal

गाझामध्ये काल हमाससोबत झालेल्या लढाईत त्यांचे २१ सैनिक मारले गेले असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिला आहे. लढाई दरम्यान एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे काही सैनिक जखमी झाले. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यामध्ये दोन इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याच वेळी इस्रायली सैन्याच्या टँकवर हमासच्या सैनिकांनी आरपीजीसह हल्ला केला. या सैनिकांच्या मृत्यूनंतर हमाससोबतच्या लढाईत आतापर्यंत इस्रायली लष्कराचे 200 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत.

इमारतीत स्फोटके ठेवल्याचा संशय

इस्त्रायली लष्कर स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या इमारतीमध्ये स्फोट झाला त्या इमारतीत मोठ्या प्रमाणात स्फोटके ठेवण्यात आल्याची माहिती आहे. इस्त्रायली सैनिक तेथे उपस्थित असताना इमारतीवर आरपीजी हल्ला करण्यात आला, त्यामुळे इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे दोन इमारती उद्ध्वस्त झाल्या. त्याचबरोबर स्फोटांमध्ये सैनिकांचा मृत्यू झाला.

Israel Hamas War
Vladimir Putin Net Worth : इलॉन मस्क अन् जेफ बेझोसपेक्षा श्रीमंत आहेत व्लादिमीर पुतीन? नेमकी किती आहे संपत्ती?

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, कालच्या घटनेत एकूण २१ सैनिक मारले गेले. सीमेवर सुमारे 600 मीटर परिसरात सैनिक तैनात होते. तेथील सैनिक हमासच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करत होते. दुपारी चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी आरपीजीने हल्ला केला. दरम्यान, दोन मजली इमारतींमध्ये स्फोट झाला. त्यानंतर इमारती कोसळल्या. या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबून जवानांचा मृत्यू झाला होता.

Israel Hamas War
Elon Musk : भारताच्या UNSCमधील स्थायी सदस्यत्वासाठी इलॉन मस्क यांची जोरदार बॅटिंग; उघडपणे केलं समर्थन

इजिप्तने इस्राइलला इशारा दिला

फिलाडेल्फिया कॉरिडॉर या दोन्ही देशांच्या सीमेवरील जमिनीचा तुकडा इस्राइलने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात, असा इशारा इजिप्तने इस्राइलला दिला आहे. फिलाडेल्फिया कॉरिडॉर हा इजिप्त आणि इस्राइलमधील 14 किलोमीटर लांबीचा परिसर आहे. या भागातून गाझामध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी होत असल्याने इस्त्रायली लष्कर या भागाचा ताबा घेण्याचा विचार करत आहे. सीमेवरील लष्करी कारवाईमुळे मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी आपल्या हद्दीत घुसू शकतात, अशी इजिप्तला चिंता आहे.

Israel Hamas War
Chicago Shooting: अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना; शिकागोजवळ 7 जणांची हत्या, 23 वर्षीय संशयित अद्याप फरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com