Japanese whiskey : जपानी व्हिस्की इतकी महाग का असते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Japanese whiskey

Japanese whiskey : जपानी व्हिस्की इतकी महाग का असते?

Japanese whiskey : जपानमधील व्हिस्कीला जपानी मद्य प्रेमींच्या हृदयात विशेष स्थान आहे. परंतु गेल्या काही वर्षांत जपानच्या बाहेरही जपानी व्हिस्कीची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. जपानी व्हिस्कीचा पुरवठा जगातील विविध देशांमध्ये होत असल्याने त्याची किंमत गगनाला भिडू लागली आहे. कमी पुरवठ्यामुळे जपानी व्हिस्कीच्या लिलावाचा ट्रेंडही वाढला, त्यामुळे त्याची किंमत वाढली.

1930 च्या दशकात जपानमध्ये व्हिस्की उद्योग सुरू झाला तेव्हा त्याला विशेष मागणी नव्हती. मात्र त्यानंतर गुणवत्तेमुळे त्याची मागणी वाढली. अलीकडे जपानी व्हिस्की त्याच्या किरकोळ किमतीच्या दहा पटीने विकली जात आहे. यामाझाकी, हाकुशू आणि हिबिकी या जपानी व्हिस्कीच्या सर्वाधिक लोकप्रिय व्हिस्कीने मागणी वाढल्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे.

जपानी व्हिस्की इतकी महाग का आहे?

स्कॉटलंड किंवा अमेरिकेसारख्या इतर व्हिस्की उत्पादक देशांच्या तुलनेत जपानमध्ये व्हिस्कीचे उत्पादन कमी आहे. जपानी व्हिस्कीबद्दल असे मानले जाते की त्याची गुणवत्ता अधिक चांगली आहे. गुणवत्ता राखण्यासाठी, उत्पादन खर्च जास्त आहे. त्यामुळे त्याची किंमत वाढते.

जपानी व्हिस्कीला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. जपानी व्हिस्कीला जागतिक व्यासपीठावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे जगात जपानी व्हिस्कीची प्रतिष्ठा वाढली आहे. याशिवाय आयात कर आणि शुल्कामुळे जपानी मद्यही महाग आहे. जर कोणी जपानच्या बाहेर जपानी व्हिस्की विकत घेतली तर त्याची किंमत आयात कर आणि स्थानिक करामुळे वाढते.

जपानी व्हिस्की अर्थव्यवस्थेसाठी ठरते वरदान

कोरोनानंतर जपानची अर्थव्यवस्था ढासळली आहे. अशा परिस्थितीत जपानी व्हिस्की देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी वरदान मानली जात आहे. जपानमध्ये सरकारने सेक व्हिवा मोहिमेद्वारे लोकांना दारू पिण्यास प्रोत्साहित केले आहे. 2020 मध्ये जपानमधील दारूचे उत्पन्न 1.7 टक्क्यांवर आले. तेव्हापासून जपान सरकार महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Sec Viva ही सेवा जपानच्या नॅशनल टॅक्स एजन्सीने (NTA) सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत 20 ते 39 वयोगटातील लोकांना दारूच्या सेवनास प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे.

जपानमध्ये व्हिस्कीचे उत्पादन कमी का झालं?

एनटीएच्या अहवालानुसार, 1999 मध्ये जपानमध्ये अल्कोहोलचे उत्पन्न शिखरावर होते. मात्र त्यानंतर सातत्याने घसरण होत गेली. NTA च्या मते, 2020 मध्ये, जपानमध्ये दारूच्या विक्रीतून सुमारे 1.1 ट्रिलियन येन कमावले गेले, जे 2016 च्या तुलनेत 13 टक्के कमी होते. अशा स्थितीत जपानी व्हिस्की देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जाते.