

US Venezuela Tensions Drug Claims Or Hidden Economic Reasons
Esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनं जगभरात खळबळ उडाली. त्यात म्हटलं होतं की, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्याची धाडसी मोहीम यशस्वीपणे पूर्ण झालीय. ट्रम्प यांच्या या पोस्टनं सर्वांनाच धक्का बसला. जगासाठी हा अचानक केलेला हल्ला आणि कारवाई असली तरी याची तयारी अमेरिकेकडून गेल्या पाच महिन्यांपासून केली जात होती. ऑपरेशन एब्सॉल्यूट रिजॉल्व असं या मोहिमेला नाव देण्यात आलंय.