

US Judicial System Allows Judges To Serve For Life Here Is Why
Esakal
व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अमेरिकेन लष्कराने ताब्यात घेतल्यानं सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यूयॉर्क कोर्टात त्यांच्यावर खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी ९२ वर्षीय वरिष्ठ न्यायमूर्ती एल्विन हेलरस्टीन हे करत आहेत. एल्विन यांच्या वयामुळे पुन्हा एकदा अमेरिकेतली न्यायमूर्ती आणि त्यांच्या वयाची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेत अनेकदा ८० ते ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले न्यायाधीश खटल्याची सुनावणी करत असल्याचं दिसतं. तिथं न्यायाधीशांना निवृत्तीची वयोमर्यादा नाहीय. यामागे संविधान, कायदा आणि राजकारण अशी तिन्हींची भूमिका आहे.