esakal | रशियाची कोरोनावरील लस भारताला मिळणार का? 
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi and vladimir putin.jpg

जगातील सर्वात पहिली कोरोनावरील लस तयार करण्यात रशियाला यश आलं आहे.

रशियाची कोरोनावरील लस भारताला मिळणार का? 

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जगातील सर्वात पहिली कोरोनावरील लस तयार करण्यात रशियाला यश आलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी स्वत: याबाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे पुतीन यांच्या दोन मुलींनाही कोरोनावरील लस देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनावरील लस निर्मितीच्या कामात रशियाने बाजी मारल्याचं दिसत आहे. लस निर्माण झाल्यानंतर रशिया ही लस कोणत्या देशांना देईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. 

पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

रशियाने फिलीपींसला कोरोनावरील लस देण्याची ऑफर दिली आहे. फिलीपींसचे राष्ट्रपती रोड्रियो दुतेर्ते यांनी ही ऑफर स्वीकारली आहे. तसेच रोड्रियो म्हणाले आहेत की सर्वात आधी ते लस टोचून घेणार आहेत. रोड्रियो लसीचा डोस घेऊन रशियाप्रती आपली कृतज्ञता दाखवणार आहेत. रशियाने तयार केलेली लस मी सार्वजनिकरित्या टोचून घेईन. सर्वात आधी माझ्यावर प्रयोग केला जाईल, मला काहीही अडचण नाही, असं ते म्हणाले आहेत. दुतेर्ते रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना आपला आदर्श मानतात. 

कोरोनावरीस लस तयार करण्यात यश मिळाल्याने रशिया ही लस कोणत्या देशांना देईल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. रशिया सर्वात आधी आपल्या मित्र राष्ट्रांना ही लस देणार आहे. त्यामुळे भारताचा जूना मित्र असलेला रशिया भारताला लस देण्याची शक्यता आहे. मात्र, रशियाने याबाबतची अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. ब्रिटनने यापूर्वीच रशियाची लस वापरणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इंस्टिट्यूटने एडेनोवायरस बनवून ही लस तयार केली आहे. संशोधनामध्ये सामील झालेल्या सर्व वैज्ञानिकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. काही लोकांना लस देण्यात आल्यानंतर त्यांना ताप आला होता. ताप आपेल्यांनी पैरासिटामॉल हे औषध घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनावरील लस सप्टेंबरमध्ये आरोग्य कर्मचारी, वयस्कर व्यक्तींना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 1 जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. रशिया नागरिकांना मुफ्तमध्ये ही लस दिली जाणार आहे. 

Beirut Blasts: नागरिकांच्या रोषासमोर अखेर सरकार झुकले

रशियाने अत्यंत कमी वेळात लस तयार केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लसीबाबत शंका घेतली आहे. रशियाने लस संदर्भातील कोणतेही संशोधन जाहीर केलेले नाही, त्यामुळे आरोग्य संघटनेने यावर अविश्वास दाखवला आहे. तसेच सर्व लोकांना ही लस देणं धोक्याचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिका, ब्रिटेन, इस्त्राईल, जापान, चीन आणि भारतामध्ये कोरोना लसीच्या चाचण्या सुरु आहेत. जगभरातील 5 उमेदवार लस निर्मितीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहेत. 

loading image
go to top