महाराणी जाताच, राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर; विलियमने ढकलल्याचा प्रिंस हॅरीचा दावा | Prince harry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

william  and prince harry

महाराणी जाताच, राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर; विलियमने ढकलल्याचा प्रिंस हॅरीचा दावा | Prince harry

लंडन - काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं आहे. या घटनेला काही महिने उलटताच आता राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ब्रिटिश राजघराण्याशी असलेले संबंध संपुष्टात आणणाऱ्या प्रिन्स हॅरी यांनी आपल्या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे केले आहे.

हेही वाचा: UPमध्ये हत्या-दरोड्यांच्या शुटींगचा खर्च वाचेल कारण...; योगींच्या मुंबई दौऱ्यावर 'AAP'ची टीका

प्रिन्स हॅरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, अमेरिकन पत्नी मेगन मार्कल हिच्यामुळे झालेल्या वादात भाऊ प्रिन्स विलियम यांनी मला फरशीवर ढकलले होते.

2019 मध्ये लंडनच्या घरी झालेल्या संघर्षाचे वर्णन करताना, हॅरीने लिहिले की, विलियमने मेगनला "हट्टी", "उद्धट" आणि "असभ्य म्हटले होते, याबाबत गार्डियनने वृत्त दिले. गार्डियनने हॅरीचे आत्मचरित्र स्पेअरची प्रत पाहिल्याचा दावा केला आहे. हॅरीने आपल्या आत्मचरित्रात पुढं म्हटलं की, जेव्हा विलियमने "माझी कॉलर पकडली, तेव्हा माझ्या गळ्यातील चैन तोटली. त्यानंतर मला जमिनीवर ढकलले, तेव्हा वाद विकोपाला गेला होता.

हेही वाचा: Rupali Chakankar : चित्रा वाघ-चाकणकर वाद चिघळला; महिला आयोगाची थेट कारवाई

पुढील आठवड्यात स्पेअर हे पुस्तक जगभरात प्रकाशित होणार आहे. हॅरीच्या म्हणण्यानुसार, यामुळे त्याच्या पाठीवर दुखापतीच्या स्पष्ट खुणा होत्या. अशा अनेक विलक्षण घटनांचा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकामुळे ब्रिटिश राजघराण्याच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

केन्सिंग्टन पॅलेसने यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही". या पुस्तकाचे शीर्षक राजघराण्यातील आणि अभिजात वर्गातील एका जुन्या म्हणीवरून घेण्यात आले आहे. पहिल्या मुलाला पद, सत्ता आणि भाग्य यांचा वारसा मिळतो. पहिल्या मुलाला काही झाले तर, दुसरे मुलगा पदाचा मानकरी ठरतो. दुसरा मुलगा हा केवळ पर्याय अर्थात स्पेअर असतो.

टॅग्स :Londonqueen elizabeth