

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथे बांधलेलं विंचेस्टर मिस्ट्री हाऊस ही एक केवळ हवेली नाही तर रहस्यमय गोष्टींचं उगमस्थान आहे. हवेलीतल्या पायऱ्या कुठेच पोहोचत नाहीत, दरवाजे अचानक भितींवर आदळतात आणि शेकडो खोल्या असलेलं हे भुलभुलैया देशातलं सगळ्यात प्रसिद्ध घर ठरलं आहे.