esakal | Video: पोलिसांनी मुलांच्या डोळ्यांसमोर घातल्या 7 गोळ्या
sakal

बोलून बातमी शोधा

wisconsin protest as jacob blake shot seven times in the back in front of his kids by cops video viral

पोलिसांनी मुलांच्या डोळ्यांदेखत वडिलांच्या पाठीत सात गोळ्या झाडल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांवर कारवाई करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहेत.

Video: पोलिसांनी मुलांच्या डोळ्यांसमोर घातल्या 7 गोळ्या

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : पोलिसांनी मुलांच्या डोळ्यांदेखत वडिलांच्या पाठीत सात गोळ्या झाडल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांवर कारवाई करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहेत.

Live Video: ट्रक आला वेगात अन् गेला वाहून पाण्यात

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विस्कॉन्सिनच्या कॅनेशा शहरात दोन पोलिसांनी कृष्णवर्णीय जेकब ब्लेकवर या व्यक्तीच्या पाठीवर त्यांच्या मुलांसमोर सात गोळी झाडल्या. पोलिसांनी आपल्या निवेदनात ब्लेक यांच्याकडे शस्त्र असल्यामुळे गोळ्या झाडल्याचे सांगितले. पण, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ब्लेककडे शस्त्र नसल्याचे दिसत आहे. गोळ्या झाडल्यानंतर ब्लेक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने ते बचावले असून, त्यांचा जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण, पोलिसांच्या या कौर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेकबचा वकील बेन क्रंपया यांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या एसयूव्हीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी जेकबवर गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. या प्रकरणानंतर नागरिकांनी कॅनोशा कोर्टहाऊससमोर निदर्शने केली. यानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कॅनोशा पोलिसांनी विस्कॉन्सिन गुन्हे अन्वेषण विभागाला चौकशी करण्यास सांगितले आहे. यानंतर गोळ्या झाडणाऱया पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेत गेल्या दोन महिन्यांतील कृष्णवर्णीयांवर पोलिसांनी गोळीबार केल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 12 जून रोजी, जॉर्जियामधील अटलांटामध्ये अटकेच्या काही धिकाऱ्यांनी 27 वर्षीय राशर्ड ब्रुक्सला गोळ्या घातल्या होत्या.

loading image
go to top