esakal | Live Video: ट्रक आला वेगात अन् गेला वाहून पाण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

carry the truck with water at rajasthan live video viral

सिमेंटच्या गोण्या घेऊन निघालेला ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, सुदैवाने या घटनेत चालकाला वाचविण्यात यश आले आहे.

Live Video: ट्रक आला वेगात अन् गेला वाहून पाण्यात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बांसवाडा (राजस्थान) : सिमेंटच्या गोण्या घेऊन निघालेला ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, सुदैवाने या घटनेत चालकाला वाचविण्यात यश आले आहे.

Video: पाण्यात 16 तास अडकलेल्या युवकाची हवाई दलाकडून सुटका...

उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नद्यांना पूर येत असून, अनेक गावांचा संपर्क तुटत चालला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. शिवाय, पाण्याच्या प्रवाहामुळे काहींना जीव गमवावा लागला आहे. राजस्थानमध्ये एक ट्रक वाहून गेल्याची घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक ट्रक वेगाने येत होता. पुलावर पाणी वाहात होते. पण, पाण्यातून ट्रक जाईल, असे ट्रकचालकाला वाटत होते. वेगामध्येच त्याने ट्रक पुलावर चालवण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ट्रक पाण्यात वाहून गेल्यानंतर ट्रकचालक वाचला असेल असे वाटत नाही. पण, पोलिसांनी ट्रकचालकाला सुखरूप बाहेर काढले आहे. संबंधित घटना उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, रतलाममध्ये एक व्हॅन मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्यात वाहून गेली आहे. या गाडीतील 3 जणांना दोरीने वाचवण्यात यश आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील चालकांना वाचवण्यात पोलिसांना यथ आले आहे.

Live Video: ट्रकने ठोकरले दोन मोटारींना अन्..