हॉटेलात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं भांडण, रागारागात दिलेली टिप पाहून व्हाल थक्क !

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

फ्लोरिडा: हॉटेलात गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डचं भांडण झालं या भांडणाच्या रागागात तरूणीने वेटरला तब्बल 03 लाख 43 रूपपयांची टिप दिली. ती सुद्धा तिच्या बॉयफ्रेन्डच्या क्रेडीट कार्डने. फ्लोरिडातील एका क्लीअर स्काय कॅफेमध्ये बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्डचं भांडण झालं आणि भांडणाच्या तावातावात तरूणीने हॉटेलमध्ये ही टिप दिली आहे.

तरूणीचं नाव सेरीना असून ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत वाद घालत होती. न्यूयॉर्कला घरी जाण्यासाठी प्लेनचं तिकीट खरेदी करून दे, यावरून हा वाद सुरू होता. पण तिच्या बॉयफ्रेन्डने नकार दिला. दोघांमध्ये चांगलंच खडाजंगी भांडण झालं. त्याच्या नकाराचा बदला घेण्यासाठी नंतर रागारागात सेरीनाने हॉटेलमध्ये 05 हजार डॉलरची टिप दिली. पण त्यांचं बील केवळ 55 डॉलर इतकंच झालं होतं.

पोलिसांनी या प्रकरणी सेरीनाला अटकही केली. बॉयफ्रेन्डने सांगितले की, सेरीनाने मद्यसेवन केलं होतं. ज्या व्यक्तीचं क्रेडीट कार्ड आहे, त्याच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करणे हा गुन्हा आहे. तो तिने केला होता. त्यामुळे सेरीनाला 01 हजार डॉलरचा दंडही भरावा लागला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman charged with theft after leaving $5,000 tip on boyfriend's credit card

टॅग्स