दहा वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने दिला बाळाला जन्म

वृत्तसंस्था
सोमवार, 7 जानेवारी 2019

न्यूयॉर्कः गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने 29 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला असून, बाळाची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती अहवालाद्वारे देण्यात आली आहे. मात्र, या घटनेमळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

न्यूयॉर्कः गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने 29 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला असून, बाळाची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती अहवालाद्वारे देण्यात आली आहे. मात्र, या घटनेमळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेली माहिला गर्भवती राहिली कशी? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील हॅसिएंडा हेल्थ केअरमध्ये ही घटना घडली आहे. रुग्णालयामध्ये कोणीतरी या महिलेवर बलात्कार केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या महिलेसाठी आवाज उठवला असून. टाशा मेनेकर नावाच्या एका महिला वकिलानी रुग्णालयातल्या सर्व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहा वर्षापूर्वी या पीडित महिलेचा अपघात झाला होता. अपघातानंतर ब्रेन हॅमरेज होऊन ती कोमात गेली आहे. तेव्हापासून ती रूग्णालयात असून, तिच्यावर पूर्णवेळ उपचार सुरू आहेत. 29 डिसेंबरच्या रात्री अचानक रुग्णालयातील नर्सला त्या महिलेच्या पोटाजवळ हालचाल दिसून आली. शिवाय, महिला हलक्या आवाजात कण्हत होती. नर्सने तपासले असता तिला प्रसूती कळा सुरू असल्याचे लक्षात आले. महिला गरोदर असल्याचे नर्स व डॉक्टरांच्या लक्षात आले. काही वेळातच त्या महिलेने मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्या महिलेच्या हालचाली पुन्हा बंद झाल्या.

दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून कोमात असणाऱ्या महिलेने बाळाला जन्म दिला आहे. दररोजच्या तपासणी दरम्यान तिच्यावर झालेल्या लैगिंग अत्याचारातून ही घटना घडली असावी, या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman in coma for over ten years gives birth as police launch investigation