असली बायको नको रे बाबा! नवऱ्याचं 4 कोटी कोण लुटत व्हयं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

couple

पत्नीनं पतीला लावला तब्बल चार कोटींचा चुना

असली बायको नको रे बाबा! नवऱ्याचं 4 कोटी कोण लुटत व्हयं?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

विवाह हा जगातील सर्वात पवित्र विधींपैकी एक मानला जातो आणि पती-पत्नीचं नातं हे सर्वात पवित्र नात्यांपैकी एक. या नात्यात कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवली जात नाही, जर हे नाते प्राणपणानं जपलं तर आयुष्य शांततेने घालवले जाते. अमेरिकेतील कनेक्टिकलमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीला २० वर्ष वेड्यात काढले आहे. तिनं जे केलं, ते खरोखरच विचित्र होतं. महिलेने तिच्या पतीच्या खात्यातून सुमारे साडेचार कोटी रुपये उडवले आणि त्याला कळूही दिले नाही. कनेक्टिकटमध्ये राहणाऱ्या या माणसाचे आयुष्य त्याच्या पत्नीने अशा प्रकारे उद्ध्वस्त केले की, पैशांसोबतच त्यांचे मानसिक संतुलन (वुमन कन्व्हिन्सेस हसबंड हॅज अल्झायमर) देखील जवळजवळ बिघडलं आहे. चोरी करण्याची ही पद्धत इतकी अफलातून होती की, बायकोने नवऱ्याचा केलेला असा विश्वासघात याआधी तुम्ही फक्त चित्रपटांमध्येच पाहिला असेल.

हेही वाचा: काबूल पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरलं, इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी

डोना मॅरिनो नावाच्या या महिलेने तिच्या पतीच्या खात्यातून हळूहळू ४ कोटी ४४ लाख रुपये काढले. पतीने जेव्हा जेव्हा याबद्दल विचारले, तेव्हा ती महिला त्याला इतकी गोंधळात टाकायची की त्याला त्याच्या आठवणींवरही विश्वास बसेना. ही गोष्ट स्त्रीच्या विश्वासाची आणि दुष्ट मनाची आहे.

धूर्त महिलेने तिच्या पतीच्या पेन्शनचे चेक्स, नुकसान भरपाई (कॉम्पेनसेशन पेमेंट्स) आणि २० वर्षांच्या सामाजिक सुरक्षा उत्पन्नातून (सोशल सिक्युरिटी इनकम) ६,००,००० डॉलर्स म्हणजेच ४ कोटी ४४ लाख रुपये चोरले. पतीच्या आर्थिक बाबींची सर्व जबाबदारी पत्नीच्या हातात असल्याने ती मुकाटपणे पैसे चोरून पतीला स्मृतिभ्रंश झाल्याचे पटवून देत असे. जेव्हा-जेव्हा पतीला बँकेत जायचे होते, तेव्हा आरोपी पत्नी म्हणायची की, त्याच्या अल्झायमरमुळे गेल्या वेळी तिथे गोंधळ झाला होता, त्यामुळे त्याने तिथे जाऊ नये. पतीने आपला आजार कधीच डॉक्टरांना दाखवला नाही, मात्र पत्नीनं वारंवार सांगितल्यामुळे त्यानंही स्वतःला अल्झायमर झाल्याची समजूत करून घेतली.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

मुलीने कागदपत्रे पाहिली आणि घडलेला प्रकार समोर आला.-

या माणसाच्या दुसऱ्या पत्नीचा हा घोटाळा तेव्हा उघडकीस आला, जेव्हा त्याच्या मुलीने त्या व्यक्तीच्या फाइनेंशियल डिटेल्स पाहिल्या. त्या व्यक्तीला त्याच्या क्रेडिट कार्डपासून खात्यातील इतर व्यवहारांची माहितीच नव्हती. या प्रकरणाच्या तपासानंतर डोना मारिनोने पतीच्या खात्यातून पैसे काढून त्याच्या खात्यात जमा केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत तिने कुटुंबाला मदत करण्यासाठी हे काम करत असल्याचे सांगितले. सध्या या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तिच्या पतीने तिला घटस्फोटही दिला आहे.

loading image
go to top