अबब ! एक-दोन नव्हे चक्क ९ मुलांना एकाच वेळी दिला जन्म

सोशल मीडियावर होते या महिलेची चर्चा
mother and baby
mother and baby

घरातील एखादी स्त्री (woman) प्रेग्नंट असेल तर घरातलं वातावरण पार बदलून जातं. सगळीकडे आनंद, उत्साह निर्माण असतो. लवकरच घरात एक नवीन चिमुकला पाहुणा येणार या कल्पनेनेचं सगळे भारावून गेले असतात. त्यातच एखाद्या स्त्रीला जुळं किंवा तिळं झालं तर ही गोष्टदेखील आता काही नवीन राहिलेली नाही. परंतु, जर एकाच वेळी तीनपेक्षा जास्त मुलांना जन्म दिला तर अनेकजण आश्चर्यचकित होतात. विशेष म्हणजे असाच एक थक्क करणारा प्रकार आफ्रिकेत घडला आहे. एका महिलेने एक-दोन नव्हे, तर चक्क ९ बाळांना एकाच वेळी जन्म दिला आहे.(Woman Gives Birth To Nine Children)

मोरक्कोमधील (Morocco) माली येथे राहणाऱ्या एका महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म दिला आहे. हलीमा सीजे (Halima Cisse) असं या महिलेचं नाव असून तिची आणि बाळांची प्रकृती चांगली आहे. (woman gives birth to nine children in morocco mali viral news)

mother and baby
'मला मरायचं नाहीये, मला माझ्या बहिणीला पाहायचं आहे'; मन हेलावणारा व्हिडीओ

हलीमा सीजे प्रेग्नंट असतांना तिच्या पोटात सहा बाळं असतील असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात डिलीव्हरीच्या वेळी तिने ९ बाळांना जन्म दिला. विशेष म्हणजे एकाच वेळी पोटात ९ बाळं राहिली कशी हा प्रश्न अनेकांना पडला आहे. हलीमा सीजे यांच्या प्रकृतीविषयी माली प्रशासनाला समजल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी त्यांना ३० मार्च २०२० मध्ये मोरक्को येथे पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर मोरक्को येथे हलीमा यांनी त्यांच्या ९ बाळांना जन्म दिला आहे.

शस्त्रक्रियेद्वारे हलीमा यांची डिलीव्हरी करण्यात आली. त्यांनी ४ मुले व ५ मुलींना जन्म दिला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील असे थक्क करणारे अनेक प्रकार समोर आले आहेत. युनायटेड किंगडममध्ये एका २१ वर्षीय महिलेने सर्वात जास्त वजनदार बाळाला जन्म दिला होता. तिच्या पोटाचा वाढता आकार पाहून तिचा जुळं होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, तिने एकाच बाळाला जन्म दिला, ज्याचं वजन सर्वात जास्त होतं. या मुलाचं जन्माच्या वेळी वजन ५ किलो ८०० ग्रॅम होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com