
नवी दिल्ली - जगात एकापेक्षा एक प्रामाणिक लोक आहेत. काही लोकांचा प्रामाणिकपणा कधी तरी सर्वांसमोर येतो. तर कधीकधी कुणालाही माहितही होत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. सर्वांना प्रेरणा देणाऱ्या घटनेत एका महिलेला जेवणाच्या पार्सलमध्ये मिळालेले पैसे महिलेने परत केले आहे.
बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, एका महिलेने KFC मधून सँडविच ऑर्डर केले होते. सँडविच खाण्यासाठी पॅकेट उघडताच त्यात महिलेला पैसे आढळून आले. सँडविचमध्ये पैसे पाहुन महिलेला आश्चर्याचा धक्का बसला होते. सँडविचमध्ये जवळपास 500 डॉलर होते. भारतीय चलनात याचे मुल्य 43 हजार रुपये आहे. मात्र महिलेने ते पैसे परत केले. महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली.
जॉर्जिया येथील रहिवासी असलेल्या जोएन ऑलिव्हर असं या महिलेचं नाव आहे. सँडविचमध्ये 500 डॉलर मिळाले. तिने KFC मधून सँडविच ऑर्डर केले होते. मात्र आलेल्या पार्सलमध्ये पैसे आढळून आले. मात्र त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत सर्व पैसे परत केले. यासोबतच त्यांनी पोलिसांनाही याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची परिस्थिती हलाखीची होती. मात्र तरी देखील त्यांनी प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी येऊन जोएन यांच्याकडून पैसे परत घेताना त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. तसेच जोएन यांच्यासारख्या लोकांमुळे शहर चांगले झाल्याचं नमूद केलं.
दरम्यान पोलिसांना तपासातून कळले की ही रक्कम केएफसीचं दररोजचं कलेक्शन होतं. जे चुकून जोएन यांच्या पार्सलच्या बॅगेत टाकले गेले. जोएन यांच्या प्रामाणिकपणामुळे केएफसीच्या मॅनेजरची नोकरी वाचल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.