esakal | २४ व्या वर्षी ३ वेळा लग्न, सात मुलांची आई झाल्यानंतर आता म्हणते...
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

२४ व्या वर्षी ३ वेळा लग्न, सात मुलांची आई झाल्यानंतर आता म्हणते...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एका महिलेने वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत तीन वेळा लग्न करून सात मुले जन्माला घातल्याची बाब समोर आली आहे. स्वतः महिलेनेच याबाबत माहिती दिली असून आता ती तिसऱ्या लग्नात समाधानी असल्याचे तिने सांगितले आहे. या महिलेने सोशल मीडियावर (viral on social media) आपली कहानी सांगितली असून ती व्हायरल झाली आहे. यामध्ये तिला तीन वेळा का लग्न करावे? याबाबत तिने खुलासा केला आहे.

हेही वाचा: Instagram वर प्रति पोस्ट ३ लाख कमाई, पाहा कोण आहेत हे चिमुकले

ही एक ब्रिटीश महिला असून 'डेली स्टार'ने याबाबत वृत्त दिले आहे. ही महिला १७ वर्षांची असताना पहिल्यांदा गर्भवती होती. त्यानंतर एक वर्षांतच ती दुसऱ्यांदा गर्भवती झाली आणि दुसऱ्या मुलाला जन्म दिला. २१ व्या वर्षी जेव्हा ती तिसऱ्यांदा गर्भवती झाली तेव्हा तिने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. ती तीन वर्षातच चार बाळांची आई झाली. यादरम्यान तिचे दोनदा लग्न झाले. ज्यावेळी ती गर्भवती होती, त्यावेळी तिचा पती तिला सोडून गेला होता. मात्र, जुळे बाळ होताच तो परत आला आणि त्याच्याचसोबत तिने लग्न केले. पण, ती चौथ्यांदा गर्भवती झाली तेव्हा पती परत तिला सोडून गेला. तिने चार मुलांचा एकटीने सांभाळ केल्याचे ती सांगते.

दरम्यान, तिच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती आली. चार बाळांची आई असताना देखील त्या व्यक्तीने तिचा स्वीकार केला. त्याने तिच्यासोबत लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाले असून त्यांना एकूण सात मुले आहेत. सध्या या महिलेचे वय २९ वर्ष असून तिसऱ्या लग्नात ती खुश असल्याचे सांगते.

loading image
go to top