esakal | Instagram वर प्रत्येक पोस्टमागे ३ लाख कमाई, पाहा कोण आहेत हे चिमुकले
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram

Instagram वर प्रति पोस्ट ३ लाख कमाई, पाहा कोण आहेत हे चिमुकले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सोशल मीडियावर (social media) अनेकजण आपल्या लहान मुलांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र, असे काही स्टार किड्स आहेत, जे त्यांचे फॉलोअर्स वाढविण्यासाठी इंस्टाग्रामवर (instagram) व्हिडिओ, फोटो शेअर करतात. त्यासाठी ते अधिक मेहनत देखील घेतात. याच व्हिडिओ आणि फोटोवरून त्यांना किती पैसे मिळतात? हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अगदी बालवयातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या या मुलांबाबत आज आपण जाणून घेऊयात.

जन्मापासूनच सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ -

नूह तवरेस (Noah Tavares) या मुलाचे Instagram वर @euamonono नावाने अकाउंट आहे. हा मुलगा जन्म घेतल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्याचे १० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स असून तवरेस हा इंस्टाग्रामवरील लोकप्रिय किड्सच्या यादीमध्ये पहिला आहे. त्याच्या प्रत्येक पोस्ट जवळपास ४४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळतात. त्यामुळेच तो प्रत्येक पोस्टमागे जवळपास साडेतीन लाख रुपयांची कमाई करतोय.

मार्ले ग्रांट -

इंस्टाग्रामवरील लोकप्रिय किड्सच्या यादीमध्ये मार्ले ग्रांट (Marleigh Grant) या मुलीचे नाव देखील आहे. ग्रांटचे अकाउंट @theeeetbaby नावाने असून तिने आपल्या अंकलसोबतच्या एका व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तिच्या प्रत्येक पोस्टला जवळपास दीड लाख लाईक्स मिळतात. तसेच तिचे इंस्टाग्रामवर १० लाखांच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. तिची प्रत्येक पोस्टमागे जवळपास तीन लाख रुपये कमाई होत असल्याचे सांगितले जाते.

हैल्स्टन ब्लेक फिशर -

हैल्स्टन ब्लेक फिशर ही दोन वर्षांची असून तिचे @halston.blake या नावाने अकाऊंट आहे. तिचे ६ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स असून तिला प्रत्येक पोस्टला जवळपास ५० हजार लाईक्स मिळतात. त्यामुळे ती प्रत्येक पोस्टमागे २ लाख कमवित असल्याचा अंदाज आहे.

ड्रू हेजेल आणि फ्लाविया लुईस -

ड्रू हेजेल ही इंस्टाग्रामवर आपल्या स्मित हास्यासाठी प्रसिद्ध आहे. तिला प्रत्येक पोस्टमागे हजारो लाईक्स मिळत असून @drewhazeleast या नावाने तिचे अकाऊंट आहे. तिचे ५ लाखांच्या जवळपास फॉलोअर्स असून ती प्रति पोस्ट १ लाख ८५ हजारांची कमाई करत असल्याचा अंदाज आहे. तेसच फ्लाविया लुईसचं @flavinhalouise या नावाने अकाऊंट असून तिचे अडची लाखाच्या जवळपास फॉलोअर्स आहे. तिच्या प्रत्येक पोस्टमागे ती ८५ हजाराच्या जवळपास कमविते. तसेच हे सर्व मुलं ४-५ वर्ष वयोगटातील आहेत.

loading image
go to top