टॉयलेटचे दार समजून उघडले विमानाचे 'एमर्जन्सी एक्झिट'

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

- टॉयलेटचे दार होते उघडायचे पण चुकीमुळे उघडले गेले एमर्जन्सी एक्झिट.

- पीके-702 विमानात घडला हा प्रकार.

इस्लामाबाद : विमानातील आपातकालीन खिडकी (एमर्जन्सी एक्झिट) उघडण्यासाठी कारणही तसेच हवे असते. फक्त संकटसमयी उघडली जाणारी खिडकी एका महिलेच्या चुकीमुळे क्षुल्लक कारणासाठी उघडली गेली. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (पीआयए) विमानात ही घटना घडली.

मॅन्चेस्टर विमानतळावरून पाकिस्तानच्या विमानाने हवेत उड्डाण केले. मात्र, या विमानातील प्रवाशी महिलेला टॉयलेटला जायचे होते. त्यासाठी तिने टॉयलेटचे बटण समजून एमर्जन्सी एक्झिट खिडकी उडणारे बटण दाबले. त्यामुळे हे बटण दाबताच संबंधित एमर्जन्सी खिडकी तातडीने उघडली गेली. या अचानक झालेल्या घटनेमुळे संबंधित महिला अत्यंत भयभीत झाली.

याबाबत पीआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की पीआयएचे पीके 702 विमान मॅन्चेस्टरहून इस्लामाबादकडे रवाना होणार होते. मात्र, या विमानातील प्रवाशी महिलेने एमर्जन्सी एक्झिट खिडकीचे बटण दाबले. त्यामुळे या विमानाला तब्बल 7 तास उशीर झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुमारे 40 प्रवाशांना त्यांच्या सामानासह विमानातून उतरविण्यात आले.  

दरम्यान, पीआयएचे मुख्य कार्यकारी एअर मार्शल आर्षद मलिक यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman on Pak airlines flight opens emergency exit door thinking its toilet