esakal | 'सुपरमॉम'; परीक्षा सुरु असतानाच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

hill

ब्रायना हिल नावाची महिला सध्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

'सुपरमॉम'; परीक्षा सुरु असतानाच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

चिकागो- ब्रायना हिल नावाची महिला सध्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे. हिल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देत होती, त्याचदरम्यान वेळी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. परीक्षा सुरु असतानाच तिची प्रसुती झाली. विशेष म्हणजे तिने परीक्षाही पूर्ण केली आहे. 

20 वर्षीय हिल लोयाला युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ इन चिकागोची पदवीधर आहे. तिने बार परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात होती आणि परीक्षेत कॉपी करता येऊ नये, यासाठी कॅमेरासमोरुन हलण्यास मनाई होती. 

Bihar Election : बिस्कीट चिन्ह मागे; आता शिवसेना वाजवणार 'तुतारी'

मी पेपर देणे सुरु करुन 15 ते 20 मिनिट झाले होते, त्यानंतर मला प्रसुतीसंबंधी थोडा त्रास जाणवू लागला. मी 38 आठवड्यांची प्रेंगनेट असल्याने मी त्यांना बाथरुममध्ये जाऊ देण्याची विनंती केली. मात्र, मी परीक्षेत चिटिंग करेल म्हणून त्यांनी मला कॅमेरा व्हूव्हच्या बाहेर न जाण्यास सांगितले. त्यामुळे मी परीक्षा देत राहिले आणि कसेतरी परीक्षेचा पहिला भाग पूर्ण केला. त्यानंतर मी ब्रेक घेतला, माझी आई आणि पतीला मी फोन केला. मी थोडी घाबरले होते, असं हिल हिने सांगितले.

हिलला साडेपाचच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. तिने रात्री 10 च्या सुमारास एका गोंडस मुलाला जन्म दिला. दरम्यान, हिलने अजून आपली परीक्षा पूर्ण दिली नव्हती. तिने परीक्षेचा दुसरा भाग देणे बाकी होते. यावेळी हॉस्पिटलने हिलसाठी एक स्वतंत्र रुम आरक्षित केली. रुम बाहेर 'डू नॉट डिस्टर्ब'चा बोर्ड लावण्यात आला. हिलने सांगितले की, ''मी राहीलेला पेपर पूर्ण केला. त्याचवेळी मी बाळाचीही काळजी घेत होते. मी पास होईन अशी आशा आहे, पण मी परीक्षा पूर्ण केली याचा मला जास्त अभिमान आहे''

हिलचे समर्पन पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. सोशम मीडियावर पोस्ट आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे. अनेकांनी हिलचा सुपरमॉम असा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर बार असोसिएशनच्या जाचक अटींवर टीकाही केली जात आहे.