OMG! होकारानंतर प्रेयसी तब्बल 650 फुटांवरुन कोसळली; हे हटके प्रपोज ठरलं धक्कादायक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

तुम्ही आज अशा एका  प्रपोजलबद्दल ऐकणार आहेत,  जे ऐकून तुमच्या  पायाखालची जमीन अक्षरश: सरकेल.

ऑस्ट्रिया : आयुष्यात जोडीदाराला मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. याची अचंबित करणारी अनेक उदाहरणे जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी आढळतील. आपल्या प्रियसीला पटवण्यासाठी, तिचे मन आपल्या बाजून वळवण्यासाठी काहीही करायला तयार असणारी प्रेमी जमात प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात असते. अगदी इप्सित जोडीदारापुढे प्रपोजल ठेवण्याची पद्धती देखील अनेकांची हटके अशीच असते, जेणेकरुन ती आयुष्यभर लक्षात रहावी. मात्र, तुम्ही आज अशा एका  प्रपोजलबद्दल ऐकणार आहेत,  जे ऐकून तुमच्या  पायाखालची जमीन अक्षरश: सरकेल. एका युवतीला 650 फुटांवर रोमँटीकपणे प्रपोज केल्यानंतर तीने अर्थातच लाजून हो म्हटलं. पण त्यानंतर तिचा त्या उंच ठिकाणी पाय घसरला आणि ती 650 फुटांवरुन खाली पडल्याची घटना घडली आहे. 

हेही वाचा - अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटींवर; दररोज सुमारे 2,280 मृत्यू

Bild नावाच्या न्यूज वेबसाईटने याबाबतची माहिती दिलीय. 27 वर्षीय युवकाने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. मात्र, त्यानंतर ती पाय घसरून 650 फुटांवरुन कोसळली. ही दुर्घटना घडलीय ती ऑस्ट्रिया देशात कॅरिंथियामध्ये...या महिलेचे वय 32 वर्षे आहे. 27 डिसेंबर  रोजी ही युवती आपल्या बॉयफ्रेंड सोबत फॉल्कर्ट माऊंटनवर गेली होती. जिथे तिच्या बॉयफ्रेंडने तिला प्रपोज केलं. त्यानंतर काहीच वेळानंतर तिचा पाय घसरला आणि ती खाली कोसळली. विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आदल्या दिवशीच हे कपल फॉल्कर्ट माऊंटनवर ट्रेकिंगसाठी जाऊन आले होते.

मात्र, या प्रेमी युगुलाच्या नशिबी अद्याप रोमान्स बाकी होता. एवढ्या मोठ्या उंचीवरुन घसरुन पडून सुद्धा या 32 वर्षीय महिलेचा जीव वाचला आहे. रिपोर्टनुसार, या प्रियसीला खाली कोसळताना पाहून प्रियकराने देखील तिला वाचवण्यासाठी उडी ठोकली. मात्र तो तिला वाचवू शकला नाही कारण तो उडी मारुन 50 फूट खाली आपल्याच एका ठिकाणी अडकून पडला. नशीब म्हणायचं की ही युवती एवढ्या मोठ्या उंचीवरुन कोसळून पर्वताच्या खाली अच्छादलेल्या बर्फाच्या चादरीवर पडली. त्यामुळे तिला फार लागलं नाही. त्यानंतर एका वाटसरुने तिला बर्फावर पडलेलं पाहिलं आणि प्रशासनास सुचना केल्यानंतर तिचा जीव वाचला. सध्या ते दोघेही सुरक्षित आहेत आणि त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेवरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: womans falls down from height of 650 feet after romantic proposal