महिलेनं 8 महिन्याचं जेवण कुटुंबासाठी एकदाच बनवलं, कारण आहे रंजक

आवडीनुसार आपल्या खाण्यापिण्याचा सवयी आणि पदार्थ दोन्ही बदलत असतात.
women cooked food for 8 months
women cooked food for 8 months
Summary

आवडीनुसार आपल्या खाण्यापिण्याचा सवयी आणि पदार्थ दोन्ही बदलत असतात.

आपण खाण्याचे मोठे शौकिन असतो. अनेकांची तर सकाळी नाश्तासाठी वेगळा पदार्थ आणि सायंकाळच्या स्नॅकसाठीही वेगळं काही खाण्याची इच्छा असते. (breakfast) दुपारी जेवताना (lunch) काय खाणार, याचा आपल्यापैकी बर्‍याच जणांनी विचारही केलेला नसतो. तसेच हंगामानुसार आणि आवडीनुसार आपल्या खाण्यापिण्याचा सवयी आणि पदार्थ दोन्ही बदलत असतात. (food menu) मूडनुसार आपण खाद्यपदार्थांची डिमांड बदलतो.

दरम्यान, आता या खाणपान संदर्भातील एक वेगळी बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या कुटुंबासाठी पुढच्या तब्बल आठ महिन्यांसाठीचे अन्न तयार (Woman Cooks Food For 8 Months) करून ठेवलं आहे. तीस वर्षांच्या केल्सी शॉ (Kelsey Shaw) या महिलेने तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी पुढच्या आठ महिन्यांचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण तयार करून ते स्टोअर केलं आहे. आता जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागते, तेव्हा ते हेच अन्न गरम करून खातात. ही ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. (women cooked food for 8 months)

बऱ्याचदा आपण सकाळी शिजवलेलं अन्न रात्री खायला वैतागतो किंवा पुन्हा तेच खायचं का असा आईला संतापून प्रश्न करतो. मात्र या महिलेने चक्क एकाचवेळी पुढील आठ महिन्यांसाठीचे अन्न एकाचवेळी तयार करुन स्टोअर करुन ठेवले आहे. सध्या ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बचत करण्यासाठी त्यांनी ही युक्ती शोधून काढली आहे असं त्या सांगतात.

women cooked food for 8 months
Baby Born Twice : आश्चर्यच! एकाच बाळाला दिला दोनदा जन्म, वाचा काय आहे प्रकरण

केल्सी शॉ हिच्या घरातली पँट्री (home pantry) घरी लागवड केलेल्या भाज्यांनीच भरली आहे. याशिवाय या पँट्रीत शिजवलेलं अन्न, औषधी वनस्पती, तांदूळ आणि पास्तादेखील स्टोअर करून ठेवण्यात आलं आहे. या सुपर ऑर्गनाइज्ड आईने (super organized mom) तिच्या पँट्रीमध्ये स्टोअर केलेलं हे अन्न तिच्यासोबत तिचं कुटुंब पुढचे आठ महिने खाणार आहे. तीन मुलांची आई असणाऱ्या केल्सीने असं का केलं, याचं कारणही खूप हटके आहे. ते कारण म्हणजे बचत करणं. आता हे कसं शक्य आहे, ते आपण जाणून घेऊ या.

केल्सीचे जीवन अगदी शिस्तबद्ध आहे, असं त्या सांगतात. ती प्रत्येक पदार्थ स्टोअर करयला शिकली आहे. लोणचं असो वा मांस, तिला हे अन्न स्टोअर करण्याचं प्रत्येक टेक्निक माहिती आहे. अन्न स्टोअर करण्यासाठी केल्सीला तीन महिने लागतात. तिचं कुटुंब उन्हाळ्यात घरातच पिकवलेल्या फळभाज्या खातं, पण हिवाळ्यासाठी त्या स्टोअर करून ठेवल्या जातात. हेच स्टोअर केलेलं अन्न खातात. केल्सीने अन्न स्टोअर करण्यास सुरुवात केली, जेणेकरून तिचं कुटुंब वर्षभर फक्त घरगुती अन्नच खाऊ शकेल.

सर्व भाज्या घरीच लावण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे, कुटुंबाला ताजं अन्न मिळतं. दुसरं म्हणजे पैसेही वाचतात. केल्सीच्या म्हणण्यानुसार, ‘कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास ती पूर्णपणे तयार असेल. ती दररोज सुमारे दोन तास बागेतील वनस्पती आणि त्यांच्या देखरेखेसाठी घालवते. शेतातल्या भाज्या आणून त्या शिजवल्या जातात.’ आपल्या मुलांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहावं, अशी तिची इच्छा होती. या कारणास्तव तिने संपूर्ण कुटुंबासह शेतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

women cooked food for 8 months
Noida Twin Towers : पाडल्या जाणाऱ्या ट्वीन टॉवरच्या गुंतवणूकदारांचं काय? पैसे मिळणार का परत

एकीकडे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण व रात्रीचं जेवण नेमकं काय करावं, याचं अनेकांचं नियोजन नसतं. अशातच केल्सीने संपूर्ण कुटुंबासाठी आठ महिन्यांचं अन्न करून ठेवले असून, या प्रकाराची मोठी चर्चा सुरू आहे. तिने शेअर केलेल्या आयडियाजमुळे तिच्या या कृतीमुळे अनेकांनी तिचे कौतुक केले असून कमेंट्सही केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com