esakal | जगात वर्षभरात 93 कोटी टन अन्न वाया; पाकिस्तानपेक्षा भारतात परिस्थिती वाईट
sakal

बोलून बातमी शोधा

food

संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) आणि त्यांची भागीदार संघटना रॅप (डब्ल्यूआरएपी) यांनी ‘वाया गेलेल्या अन्नाचा निर्देशांक २०२१’ हा अहवाल जाहीर केला आहे.

जगात वर्षभरात 93 कोटी टन अन्न वाया; पाकिस्तानपेक्षा भारतात परिस्थिती वाईट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

न्यूयॉर्क - भूकबळी, गरिबी, दारिद्र्य या समस्या कमी अधिक प्रमाणात सर्वच देशात जाणवतात. त्याचप्रमाणे जगभरात अन्नही वाया जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालातील माहितीनुसार २०१९ मध्ये ९३ कोटी १० लाख टन अन्न वाया गेले आहे. यात भारताचा हिस्सा वर्षाला सहा कोटी ८७ लाख टन आहे. संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) आणि त्यांची भागीदार संघटना रॅप (डब्ल्यूआरएपी) यांनी ‘वाया गेलेल्या अन्नाचा निर्देशांक २०२१’ हा अहवाल जाहीर केला आहे. त्यात म्हटले आहे की, २०१९मध्ये ९३.१ टन अन्नातील ६१ टक्के अन्न घरांमधून, अन्न पुरवणाऱ्या संस्थांकडून २६ टक्के तर किरकोळ पद्धतीने अन्नसेवा देणाऱ्या संस्थांकडून १३ अन्न वाया गेले आहे. जगभरात जेवढे अन्न तयार होते, त्याच्या १७ टक्के भाग वाया जाऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

दोन कोटी ट्रक भरतील एवढे अन्न वाया
वाया गेलेल्या अन्नाचे वजन पूर्ण भरलेल्या दोन कोटी ३० लाख ट्रकच्या वजनाएवढे आहे. प्रत्येक ट्रकमध्ये ४०-४० टन अन्न भरले जाऊ शकते. साहित्य भरलेल्या ट्रकच्‍या बरोबरीने आहे. पृथ्वीला याचे सात फेरे होऊ शकतील, अशी तुलना संघटनेने केली आहे. दुकाने, हॉटेल आणि घरातील खराब होणाऱ्या अन्नाबरोबरच इतर अन्नाचाही अहवालात समावेश केला आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

एका व्यक्तीकडून १२१ किलो अन्न वाया
‘यूएनईपी’च्या मतानुसार जागतिक पातळीवर प्रत्येक व्यक्ती १२१ किलो अन्न दरवर्षी वाया घालवते. यातील ७४ किलो अन्न घरांतून फेकून दिले जाते. जगभरातील लोकांची अन्न वाया घालविण्याची सवय सोडवायला हवी, अशी अपेक्षा संघटनेचे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन यांना व्यक्त केली.

एका वर्षात अन्न वाया जाण्याचे प्रमाण (आकडेवारी टनांत)
भारत -
६ कोटी ८७ लाख ६० हजार १६३
अमेरिका - १ कोटी ९३ लाख ५९ हजार ९५१
चीन - ९ कोटी, १६ लाख ४६ हजार २१३

देशातील घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

केल्यांची संख्या भारतात जास्त
उपासमारीच्या २०१९मध्ये यादीत १७७ देशांचा उल्लेख असून त्यात भारताचा क्रमांक १०२ आहे. भारताची स्थिती रवांडा, नायजेरिया, अफगाणिस्तान, लीबिया अशा देशांपेक्षा चांगली आहे, पण पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ आणि इंडोनेशिया या भुकेलेल्यांची संख्या भारतापेक्षा कमी आहे.

loading image