फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश; पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी

World Happiness Index: संयुक्त राष्ट्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत भारत 136 व्या स्थानी आहे.
WORLD HAPPINESS INDEX
WORLD HAPPINESS INDEX SAKAL

World Happiness Index: संयुक्त राष्ट्राने जगातील सर्वात आनंदी देशांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत फिनलँड सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी आणि सुखी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फिनलँडला जगातील सर्वांत सुखी देशाचा मान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत भारत 136 व्या स्थानी आहे. (Finland at top, india on 136th place in World Happiness Index)

WORLD HAPPINESS INDEX
आयुर्वेदिक मसाजच्या बहाण्याने परदेशी महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये फिनलंडला सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे, तर दुसऱ्या स्थानावर डेन्मार्कचा समावेश आहे. आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे देश अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानी आहे. आर्थिक महासत्ता अमेरिका या क्रमवारीत 16 व्या आणि ब्रिटन 17 व्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत 136 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी भारताचा क्रमांक 139 वा होता. तर अफगाणिस्तान जगातील सर्वात दु:खी देश आहे.

WORLD HAPPINESS INDEX
आणखी एका कंपनीने झूम कॉलवरून 800 कर्मचाऱ्यांना टाकलं काढून

पाकिस्तान भारतापेक्षा आनंदी देश-

विशेष म्हणजे शुक्रवारी जाहीर झालेल्या या यादीत पाकिस्तान हॅपिनेस इंडेक्स यादीतील नंबर 121 व्या क्रमांकावर आहे. तर भारताचा क्रमांक 136 वा आहे. वर्ल्ड हॅपीनेस टेबलमध्ये सर्वात मोठी घसरण लेबनॉन, व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तानच्या क्रमांकामध्ये झाली आहे. तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यापासून युद्धग्रस्त अफगाणिस्तान यादीत सर्वात खालच्या नंबरवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com