कोरोना आढाव्यासाठी डब्लूएचओचा आयोग

वृत्तसंस्था
Friday, 10 July 2020

कोरोनाच्या साथीबाबत जगाला वेळीच सावध करण्यात संघटना अपयशी ठरली आणि या साथीस जबाबदार असलेल्या चीनची पाठराखणही करीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला असून सोडचिठ्ठी दिल्याची नोटीसही बजावली आहे.

जीनिव्हा - कोरोनाच्या जागतिक साथीला कसा प्रतिसाद दिला याचा प्रामाणिक आढावा घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) नवा आयोग स्थापन केला आहे.

लायबेरियाचे माजी अध्यक्ष इलन जॉन्सन आणि न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलन क्लार्क यांच्या नेतृत्वाखाली हा आयोग काम करेल. कोरोनाच्या साथीबाबत जगाला वेळीच सावध करण्यात संघटना अपयशी ठरली आणि या साथीस जबाबदार असलेल्या चीनची पाठराखणही करीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला असून सोडचिठ्ठी दिल्याची नोटीसही बजावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

त्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडली आहे. संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी सांगितले की, शिकण्याच्या प्रक्रियेतील या महत्त्वाच्या टप्यात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इतके भक्कम मनोधैर्य असलेल्या आणि स्वतंत्र वृत्तीच्या इतर नेत्यांची मी कल्पना करू शकत नाही. भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे हे समजण्यास त्यांच्यामुळे मदत होईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या जागतिक साथीच्या दरम्यान सर्वांनी एकत्र आले पाहिजे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

हा काही दिखाऊ आयोग नसेल, जो नियुक्तीनंतर ठोकळेबाज पद्धतीने काम करेल आणि अहवाल दिल्यानंतर तो कपाटात टाकला जाईल. आयोगाचे प्रशासन स्वतंत्र असेल. कामकाजातील प्रगतीबाबत सदस्य देशांना ते सातत्याने ताजी माहिती देतील. दर महिन्याला बैठक होईल.
- टेड्रोस घेब्रेयेसूस, डब्लूएचओ अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Health Organization set up a new commission to corona review