कोरोनाच्या लशीवर अवलंबून राहू नका!; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

वृत्तसंस्था
Wednesday, 19 August 2020

कोरोनावरील लसीची प्रतीक्षा न करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. लसीवर अवलंबून न राहता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही संघटनेने केले आहे.

जीनिव्हा - कोरोनाव्हायस अटकाव करण्‍यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये लसींवर संशोधन सुरू आहे. रशियाने तर लस तयार केल्याचा दावाही केला आहे. अशा वेळी कोरोनावरील लसीची प्रतीक्षा न करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. लसीवर अवलंबून न राहता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही संघटनेने केले आहे.

चाळीशीखालील रुग्णांची वाढती संख्या
पश्‍चिम प्रशांत क्षेत्रातील ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन्स आणि जपान यांसह काही देशांत कोरोनाची लागण झालेल्या ४० वर्षांखालील लोकांना संख्या वाढत आहे, असा इशारा ‘डब्ल्यूएचओ’ने दिला. सौम्‍य लक्षणांसह कोरोनाचा संसर्ग झाल्याचे त्यांच्या लक्षातही येत नाही. यामुळे त्यांच्याकडून नकळत विषाणूंचा प्रसार होते, अशी माहिती डॉ. कसाय यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व देशांना संरक्षण आवश्‍यक
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार ‘डब्ल्यूएचओ’चे पश्‍चिम प्रशांत विभागाचे संचालक डॉ. ताकेशी कसाय म्हणाले की, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यावर देशांनी लक्ष दिले पाहिजे. लसीवर जास्त अवलंबून न राहू नये. कारण सुरुवातीला मागणी जास्त असल्याने पुरेसा पुरवठा होणार नाही. जोपर्यंत सर्व देशांना संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणताही एक देश सुरक्षित असणार नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा नव्या टप्‍प्यात प्रवेश
पश्‍चिम प्रशांत क्षेत्रातील देशांनी कोरोना साथीच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या काळात सुरक्षित सार्वजनिक आरोग्याच्या दिशेने त्या-त्या देशांच्या सरकारने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन ‘डब्ल्यूएचओ’ने केले आहे. या टप्प्यात वाढणाऱ्या कोरोनावर लक्ष ठेवून शाश्‍वत उपाययोजना आवश्‍यक आहे, असे डॉ. कसाय यांनी सांगितले. यामुळे सामाजिक व्यत्यय कमी व्हावा आणि अर्थव्यवस्थेवरही फारसा ताण पडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Health Organization warning Donot rely on the corona vaccine