Mohan Bhagwat : संपूर्ण जग आता हिंदूवादाकडं आकर्षित होतंय; बँकॉकच्या हिंदू संमेलनात भागवतांनी व्यक्त केला विश्वास

आनंदी आणि समाधानी जगण्याचा विचार भारतच सर्वांना देऊ शकतो.
World Hindu Conference Bangkok RSS Chief Mohan Bhagwat
World Hindu Conference Bangkok RSS Chief Mohan Bhagwatesakal
Summary

भौतिकवाद, भांडवलवाद आणि साम्यवाद यांच्यात होणाऱ्या प्रयोगांमध्ये संभ्रमात असलेले जग आता हिंदूवादाकडे आकर्षित होत आहे.

बँकॉक : भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलवाद यांच्या प्रभावामुळे आणि प्रयोगांमध्ये संभ्रमित झालेल्या जगाला भारतच आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवेल, असा विश्‍वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केला.

World Hindu Conference Bangkok RSS Chief Mohan Bhagwat
Satara News : जटांसोबत सुटला 'ती'च्या अंधश्रद्धेचाही गुंता; दोन दशकांत 127 महिलांना केलं जटामुक्त

थायलंडची राजधानी बँकॉक येथे भागवतांच्या उपस्थितीत काल तिसऱ्या जागतिक हिंदू संमेलनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी भागवत म्हणाले,‘‘जगभरातील हिंदूंनी (Hindu) एकमेकांच्या संपर्कात राहणे आणि स्वत:ला जगाशी जोडणे आवश्‍यक आहे. हिंदू संघटित होण्यास सुरुवात होताच जगही संघटित होण्यास सुरुवात होईल.

World Hindu Conference Bangkok RSS Chief Mohan Bhagwat
Sangli Politics : जयंत पाटलांच्या गडाला धक्के देण्याचे अजितदादा गटाचे मनसुबे; 'या' नव्या शिलेदारांची लागणार कसोटी

आनंदी आणि समाधानी जगण्याचा विचार भारतच सर्वांना देऊ शकतो, हे सर्व जगाला समजले आहे. भौतिकवाद, भांडवलवाद आणि साम्यवाद यांच्यात होणाऱ्या प्रयोगांमध्ये संभ्रमात असलेले जग आता हिंदूवादाकडे आकर्षित होत आहे, असेही भागवत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com