
उत्तर कोरियानं (North Korea) त्यांच्या पूर्व किनाऱ्यावरील समुद्रात 'अज्ञात क्षेपणास्त्र' (Short-Range Missile) डागली आहेत.
उत्तर कोरियानं समुद्रात डागली क्षेपणास्त्रं
प्योंगयांग : उत्तर कोरियानं (North Korea) त्यांच्या पूर्व किनाऱ्यावरील समुद्रात 'अज्ञात क्षेपणास्त्र' (Short-Range Missile) डागली आहेत. दक्षिण कोरियन लष्कर आणि जपानी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. 'बॅलेस्टिक मिसाइल'प्रमाणं ही क्षेपणास्त्रं दिसत होती, असंही त्यांचं म्हणणं आहे. दक्षिण कोरियाच्या लष्करानं (South Korea Army) सांगितलं, की या अण्वस्त्रसज्ज देशानं (उत्तर कोरिया) समुद्रात क्षेपणास्त्रं डागलीयत. दरम्यान, उत्तर कोरियानं अमेरिकेवर शत्रुत्वाचा आरोप करत किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी बायडेन प्रशासनाकडं दक्षिण कोरियाबरोबर संयुक्त लष्करी सराव कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव दिलाय, तशी मागणीही त्यांनी केलीय.
क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर, उत्तर कोरियानं संयुक्त राष्ट्राला सांगितलं, की आम्हाला शस्त्रांची चाचणी करण्याचा अधिकार आहे. अलीकडेच या देशानं समुद्रातून क्षेपणास्त्रं डागली होती. काही दिवसांनंतर क्षेपणास्त्राची प्रथमच ट्रेनमधून यशस्वी चाचणीही घेतली होती. त्यानंतर आता कोरियन प्रदेशात तणाव निर्माण झालाय. मात्र, याबाबत दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनं कोणतीही माहिती दिली नाही.
हेही वाचा: बायडेन आडनाव अन् भारत कनेक्शन
या अण्वस्त्र चाचणीमुळे उत्तर कोरियाला अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांचा सामना करावा लागतोय. उत्तर कोरियाच्या अलीकडील शस्त्रास्त्र चाचण्या स्पष्टपणे दाखवतात, की तो दक्षिण कोरिया आणि अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून हे दोन देश निर्बंध उठवण्याकरता चर्चेसाठी सहमती दर्शवतील. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या मंत्रालयानं म्हटलंय, की आम्ही किम जोंग यांच्या वक्तव्याचा खूप आदर करतो. दक्षिण कोरिया संवादाद्वारे अण्वस्त्रीकरण आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा मुख्य उद्देश असेल आणि त्यासाठी लागेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलंय.
Web Title: World North Korea Fires Short Range Missile To Sea In Latest Test
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..