केवढं मोठ्ठ कुटुंब! Family Tree मध्ये २ कोटी ७० लाख नातेवाईक, रिसर्चमध्ये दावा

ब्रिटनच्या शास्त्रज्ञाने डीएनएच्या आधारे जगातील सर्वात मोठे कुटुंब सापडल्याचा दावा केला आहे
family tree
family treeSakal

Worlds Biggest Family Tree: आपण आजपर्यंत अनेक प्रकारच्या कुटुंबांबद्दल वाचले असेल. काही कुटुंबात (Family) पन्नास, शंभर किंवा दीडशे लोकं असले तरी तो लोकांना आश्चर्य वाटते. आजच्या काळात लोक विभक्त कुटुंबात राहतात. पण ब्रिटनच्या एका शास्त्रज्ञाने जगातील सर्वात मोठे कुटुंब सापडल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की हे कुटुंब आतापर्यंतचे सर्वात मोठे असून त्यांच्या फॅमिली ट्रीमध्ये २७ दशलक्ष म्हणजेच २ कोटी ७० लाख लोक आहेत. हे सर्व दूरचे नातेवाईक असले तरी त्यांचा एकमेकांशी संबंध आहे.

family tree
लेकरांना कसं सांभाळायचं? सुधा मुर्तींनी सांगितल्या 5 खास टिप्स

युकेच्या टीमकडून तयार केल्या गेलेल्या या वंशवृक्षाची मुळे १० हजार वर्ष जुनी आहेत. हा आतापर्यंतचे सर्वात जुना आणि सर्वात मोठा कौटुंबिक वृक्ष आहे. याच्या मदतीने मानवाची उत्पत्ती समजण्यास खूप मदत होईल, असे म्हटले जाते. या जंबो फॅमिली ट्रीच्या मदतीने वैद्यकीय गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याचे प्रमुख लेखक डॉ. यान वोंग म्हणतात, अनुवांशिक भिन्नता समजून घेण्यास यामुळे मदत मिळेल. (Worlds Biggest Family Tree)

family tree
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की एकेकाळी होते स्टँडअप कॉमेडियन

हजारो वर्ष जुन्या नातेवाईकांचा सहभाग

डॉ. यान वोंग यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत हा रिसर्च पूर्ण केला आहे. या वंशवृक्षात एकामागोमाग एक लांबचे नातेवाईक जोडले गेले आहेत. रक्ताच्या नात्याने ते एकमेकांशी नात्यात बांधले गेले आहेत. शेकडो वर्षांपासून एकत्र केलेल्याडीएनएच्या मदतीने हे कुटुंब निर्माण झाले आहे. यामध्ये अनेक कोटी लोकांचे नमुने तपासून फॅमिली ट्री बनवण्यात आले आहे. यात एकूण 27 दशलक्ष लोक आहेत. या फॅमिली ट्रीच्या मदतीने अनेक गूढ उकलली जाणार आहेत.(Worlds Biggest Family Tree)

family tree
'ही' पाच फळं नियमित खाल्ल्याने वजन होईल कमी!
DNA test
DNA testDNA test

DNA वर आधारलेली फॅमिली ट्री

जर्नल सायंन्सने याविषयीचा अभ्यास प्रकाशित केला आहे. डीएनएपासून फॅमिली ट्री तयार केल्याने त्याचा परिणाम अचूक मिळतो. यामध्ये टीमने आठ डेटाबेसमध्ये उपस्थित असलेल्या ३ हजार ६०९ मानवांच्या जनुकांचा अभ्यास केला. तसेच त्यांचे पूर्वज कुठे राहत होते, याचा अंदाज संगणकीय अल्गोरिदमद्वारे वर्तवला. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञाने २७ दशलक्ष लोकांच्या कुटुंबांचे नेटवर्क तयार केले. आता त्याच्या अभ्यासावर, अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Worlds Biggest Family Tree)

family tree
महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com