
माफिया आणि अंडरवर्ल्डचं जग कायम रहस्य आणि रोमांचाने व्यापलेले असते. अमेरिकेच्या इतिहासात अनेक कुख्यात माफिया डॉन होऊन गेले. मात्र त्या सगळ्यांमध्ये एक नाव सर्वात पुढे होते, ते म्हणजे जॉन गॉटी. लोक त्याला Teflon Don म्हणून ओळखत होते. कारण त्याच्याविरोधात जेवढे गुन्हा दाखल झाले ते कोर्टात टिकले नाहीत. त्याच्यावरचा कोणताही गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. असं असलं तरी नशीब कायम साथ देत नाही. त्याच्या काळ्या कारनाम्यांपर्यंत कायद्याचा हात पोहोचलाच.