जगात सर्वात वयस्क बाळाने तब्बल ३० वर्षांनी जन्म घेतलाय. या बाळाचं नाव थॅडियस डॅनियल पिअर्स असं आहे. वयस्क बाळ किंवा ओल्डेस्ट बेबी असं ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल तर हे खरं आहे. अमेरिकेतील ओहियोमध्ये हे घडलंय. १९९४मध्ये भ्रूण गोठवून ठेवण्यात आलं होतं आणि आता २०२५मध्ये त्याचा जन्म झाला आहे.