जगभरात आगींमुळे ४, ४०० प्रजाती धोक्यात 

यूएनआय
Friday, 27 November 2020

जगभरात आगीच्या बदलणाऱ्या घटनांमुळे तब्बल ४, ४०० प्रजाती धोक्यात आल्या आहेत, असे एका नव्या संशोधनात समोर आले आहे. इंडोनेशियातील ओरांगउटानसह पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा यात समावेश आहे. ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनाद्वारे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल मानवी परिणाम टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियातील संशोधकांचे संशोधन; पर्यावरणासाठी पुढाकाराचे आवाहन
मेलबर्न - जगभरात आगीच्या बदलणाऱ्या घटनांमुळे तब्बल ४, ४०० प्रजाती धोक्यात आल्या आहेत, असे एका नव्या संशोधनात समोर आले आहे. इंडोनेशियातील ओरांगउटानसह पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा यात समावेश आहे. ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनाद्वारे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल मानवी परिणाम टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संशोधकांच्या मते  नुकत्याच लागलेल्या आग्नेय आशिया, दक्षिण अमेरिका, क्वीन्सलॅंडपासून आर्क्टिक सर्कलपर्यंत नुकत्याच लागलेल्या आगींनी परिसंस्था नष्ट झाली. आफ्रिकेतील सव्हान्नासारख्या परिसंस्थेसाठी सततच्या आगी महत्त्वाच्या आहेत. या भागात आगीच्या घटना कमी झाल्यास झुडुपांचे अतिक्रमण होऊ शकते. त्यातून, मोकळा परिसर पसंत करणारे काळविटासारखे शाकाहारी प्राणी विस्थापित होऊ शकतात. मानवी हस्तक्षेपाबरोबरच जागतिक तापमानवाढ, जैविक आक्रमण आदी कारणांचा समावेश होतो.

ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिनबाबत का उपस्थित केली जातेय शंका?    

मेलबर्न विद्यापीठाचे संशोधक ल्यूक केली म्हणाले, ‘नव्या उपायांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिवासांची पुननिर्मिती, कमी ज्वलनशील मोकळ्या हिरव्या जागांची निर्मिती आदी उपायांचा समावेश होऊ शकतो.’

26/11: कसाबसह खात्मा झालेल्या 10 दहशतवाद्यांसाठी हाफिज सईदची 'नापाक' सभा

आगीमुळे वनस्पती व प्राण्यांच्या अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. जगात काही भागात अतिशय मोठ्या आगी लागत आहेत. या ठिकाणी आगी लागण्याचा इतिहासही आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण युरोप व पश्चिम अमेरिकेतील जंगले आणि झुडुपांमध्ये आग अधिक काळ धुमसत असल्याचे तसेच आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आमचे निरीक्षण आहे.
-  ल्यूक केली, संशोधक, मेलबर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worldwide 4400 species are endangered by fire