डब्ल्यू डब्ल्यू ई हेवीवेट चॅम्पियन केन सांभाळेल महापौर पदाचा भार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

येत्या 1 सप्टेंबर पासून अधिकृतपणे केन महापौर पदभार सांभाळणार आहे.

टेमेसी, अमेरिका : डब्ल्यू डब्ल्यू ई चे रिंग गाजवणारा कुस्तीपटू ग्लेन जेकब्ज अर्थात केन महापौर पदी लवकरच विराजमान होणार आहे. रिपब्लिकचा उमेदवार म्हणून त्याने निवडणूक लढविली आणि त्यात तो यशस्वीही झाला आहे.

अमेरिकेतील टेनेसमधील नॉक्स कौंटी शहराचा महापौर म्हणून केन पद सांभाळेल. केनला 31, 739 मतं मिळाली तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या लिंडा हेलीला 16, 611 मतं मिळाली. येत्या 1 सप्टेंबर पासून अधिकृतपणे केन महापौर पदभार सांभाळणार आहे. केन गेल्या काही वर्षापासून राजकारणात सक्रीय होता. 

नव्वदच्या दशकात डब्ल्यू डब्ल्यू ई च्या रिंगमध्ये दबदबा असलेला केन बराच काळ हेवीवेट चॅम्पियनही होता.     

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WWE wrestler Kane Elected As A Mayor Of Knox County Tennessee America