Xi Jinping : बलाढ्य चीनची ताकद आणखी वाढणार; सलग तिसऱ्यांदा शी जिनपिंग बनले 'राष्ट्राध्यक्ष'

शी जिनपिंग (Xi Jinping) तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
Xi Jinping President of China
Xi Jinping President of Chinaesakal
Summary

राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, शी जिनपिंग सोमवारी पक्षाच्या संसदीय बैठकीला संबोधित करणार आहेत. दुसरीकडं, शी जिनपिंग सोमवारी संध्याकाळीच पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

Xi Jinping President of China : शी जिनपिंग (Xi Jinping) तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. जिनपिंग यांची आज (शुक्रवार) अधिकृतपणे चीनच्या पुढील राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे.

एका नेत्याची सलग तिसऱ्यांदा देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पीपल्स पार्टी ऑफ चायनाची (People's Party of China) नॅशनल पीपल्स काँग्रेस (National People's Congress) परिषद गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात आली होती.

त्याच नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली. आज जिनपिंग यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. जिनपिंग यांची चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाच्या अध्यक्षपदीही निवड झाली आहे.

Xi Jinping President of China
Maharashtra Budget : अर्थसंकल्पात 'नागपूर'ला झुकतं माप; फडणवीसांनी कोणत्या केल्या मोठ्या घोषणा?

राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, शी जिनपिंग सोमवारी पक्षाच्या संसदीय बैठकीला संबोधित करणार आहेत. दुसरीकडं, शी जिनपिंग सोमवारी संध्याकाळीच पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, चीनच्या कम्युनिस्ट पक्षानं एक मसुदा योजना सादर केली.

Xi Jinping President of China
Politics : मोदींचं लक्ष असलेल्या राज्यात भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश

यामध्ये म्हटलंय की, कम्युनिस्ट पक्ष सरकारवर आपलं थेट नियंत्रण वाढवणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या वार्षिक बैठकीत जिनपिंग यांनी त्यांची नवीन टीमही निवडली होती. या अंतर्गत ली कियांग यांची चीनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच ली शी, डिंग झ्युझियांग आणि काई क्यूई यांनाही स्थान देण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com