XTURISMO Hoverbike: उडणारं विमान नव्हे तर दुचाकी! अमेरिकेत दाखल होतेय पहिली Flying Bike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

XTURISMO Hoverbike

XTURISMO Hoverbike: उडणारं विमान नव्हे तर दुचाकी! अमेरिकेत दाखल होतेय पहिली Flying Bike

America: मानवीनिर्मित उडणाऱ्या गोष्टींबाबत तुम्हाला कधी कोणी विचारलं तर लहानपणापासून आपल्याला तोंडपाठ असणारं एक नाव म्हणजे विमान आणि दुसरं हेलीकॉप्टर. मात्र कधी उडती दुचाकीही येऊ शकते याचा विचार तुम्ही केलाय का? आता हा विचार सत्यात उतरलाय.

होय! अमेरिकेत जगातील पहिली फ्लाईंग कार दाखल झाली असून या बाईकची उडण्याची क्षमता ४० मिनीटे आहे. तर या बाईकचा वेग 62 mph पर्यंत आहे. या बाईकची निर्मिती जपानी कंपनीकडून करण्यात आली असून जपानमध्ये तिला विक्रीसाठी देखील उपलब्ध करण्यात आलं आहे. २०२३ मध्ये ही बाईक अमेरिकेतही उपलब्ध होण्याची माहिती पुढे येतेय. या उडत्या बाईकची किंमत सात लाख सत्त्याहत्तर हजार डॉलर आहे.

ही उडती दुचाकी साधारण बाईकच्या तुलनेत वेगळी असणार असून हेलीकॉप्टर सारखं लँडिंग स्टँडही असणार आहे. ही बाईक महागडी जरी असली तरी ही आता अनेकांची ड्रिम बाईक ठरणार आहे.

Web Title: Xturismo Hoverbike Worlds First Flying Bike Launching In America Soon Japan Company Made This Bike

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :americaBike